सुरक्षित शहर बनवण्यासाठी आणखी सीसीटीव्हीची गरज : सुहेल शर्मा

सांगली : पोलीसनामा ऑनलाईन

सुरक्षित शहरांच्या यादीत अद्याप सांगलीचा समावेश झालेला नाही. सांगली शहर सुरक्षित शहर व्हावे यासाठी पोलीस दलाकडून विशेष प्रयत्न सुरु आहे. पोलीस दलाकडून सांगली, मिरज आणि कुपवाड शहरात ८० सीसीटीव्ही बसवले आहेत. सांगली शहराचा सुरक्षित शहरांच्या यादीत समावेश व्हावा यासाठी आणखी १२० सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे आवश्यक असल्याचे पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा यांनी सांगितले. शहरातील गणेशोत्सव मंडळे, सार्वजनीक, सामाजिक संस्था, संघटना, विवध असोसिएशन यांनी पुढाकार घेऊन शहरात सीसीटीव्ही बसवावेत. सुरक्षित सांगली-चांगली सांगली या ब्रिदवाक्याद्वारे यावर काम करुन सांगली सुरक्षित बनवण्याचा मानस असल्याचेही त्यांनी सांगितले.
[amazon_link asins=’B00IHS3RGQ,B01D4EYNUG’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’805104f8-b357-11e8-8344-e3b316934142′]

अधीक्षक शर्मा म्हणाले, शेजारी असणारे सोलापूर आणि कोल्हापूर शहरे सुरक्षित झाली आहेत. कोल्हापूर शहरात सीसीटीव्हीवर सात कोटी रूपयांचा खर्च करण्यात आला आहे. सोलापूर शहरही सीसीटीव्हीखाली आहे. सुरक्षित शहरांत त्यांचा समावेश झाल्याने विकासासाठी या शहरांना केंद्र शासनाकडून मोठ्या प्रमाणात निधी मिळत आहे. सांगली शहराचाही विकास करायचा असेल तसेच त्याचा समावेश सुरक्षित शहरामध्ये करायचा असल्यास किमान दोनशे सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची गरज आहे.

जाहिरात

जिल्हा नियोजन समितीमधून मिळालेल्या निधीतून उच्च दर्जाचे 80 सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. यामुळे अनेक गुन्हे उघड होण्यास मदत झाली आहे. विशेषतः वाहन चोरी, चेन स्नॅचिंग, बॅग लिफ्टींग यासारखे गुन्हे उघड होण्यास मदत झाली आहे. त्यामुळे आणखी 120 कॅमेरे तीनही शहरात बसवल्यास संपूर्ण महापालिका क्षेत्रावर पोलिसांचा वॉच राहू शकतो. त्यामुळे चोरी, मारामार्‍या सारख्या घटनांना आळा घालणे शक्य होणार आहे. आताच्या सीसीटीव्हीमुळे वाहतूक नियम मोडणार्‍यांकडून साडेतीन लाख रूपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

जाहिरात

त्यामुळे आता गणेशोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर मंडळांनी उच्च दर्जाचे सीसीटीव्ही कॅमेरे घेण्यासाठी निधी देऊन पुढाकार घ्यावा. त्याशिवाय विविध संघटना, व्यापारी, सराफ असोसिएशन, मेडिकल असोसिएशन, सामाजिक संघटना, संस्था यांनी पुढे येण्याची गरज आहे. वैयक्तिक पातळीवरही कोणी कॅमेरे देणार असतील तर त्यांचेही पोलिस दलातर्फे स्वागत करण्यात येईल असेही अधीक्षक शर्मा यांनी यावेळी सांगितले. सीसीटीव्ही बसवण्यासाठी योगदान देण्यास इच्छुक असलेल्यांनी पोलिस उपअधीक्षक (गृह) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहनही अधीक्षक शर्मा यांनी केले आहे.

इतर बातम्या

वरिष्ठ पोलिस निरीक्षकाचे ‘कामकाज’ पाहणार्‍या कर्मचार्‍यांवर गुन्हा 

मुस्लीम मुक मोर्चादरम्यान पुण्यातील वाहतूकीत बदल 

बनावट नाेटा टाेळीची पाळेमुळे पश्चिम बंंगालपर्यंत : एटीएस पथक सांगलीत दाखल

यंदाच्या गणेशोत्सवावर महागाईचे सावट 

कमर बाजवांचा बाजा मोदी वाजवणार का? : शिवसेना