सुंदर चेहरा आणि चमकदार केसांसाठी पौष्टिक आहार महत्वाचा, जाणून घ्या ‘या’ 5 महत्वाच्या गोष्टी

पोलिसनामा ऑनलाइन – केसांच्या आरोग्यावर प्रदूषण, आजार, पौष्टिक आहाराचा अभाव, इत्यादीचा परिणाम होतो. केसांची योग्य काळजी न घेणे, केस कापण्याची चुकीची पद्धत, जीवनसत्त्व तसेच प्रोटीनचा अभाव यामुळे केसांच्या अनेक समस्या निर्माण होतात. शरीराप्रमाणेच केसांनाही पोषकतत्त्वांचा पुरवठा होणे आवश्यक असते. सुंदर आणि चमकदार केसांसाठी पौष्टिक आहार घेतला पाहिजे.

हे लक्षात ठेवा

1 पिंपल्स, व्रण, केसांच्या विविध समस्या, चेहर्‍यावरील सुरकुत्या, वांग व काळे डाग यांची चिंता करण्यापेक्षा डॉक्टरांना दाखवून लवकर निदान करा.

2 सध्या लहान मुलांमध्ये पांढरे केस होण्याचे प्रमाण वाढलेले आहे. पांढरे केस होण्याची ताणतणाव आणि खाण्यात झालेला बदल ही दोन कारणे आहेत. याकडे वेळीच लक्ष द्या.

3 पांढरे झालेले केस काळे करण्यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार योग्य तो उपचार घ्या. डाय, मेहंदी अथवा कोणत्याही प्रकारचे रासायनिक द्रव्य केसाला लावू नका.

4 पौष्टिक आहार घ्या.

5 प्रदुषणापासून स्वताला दूर ठेवण्याचा प्रयत्न करा.