व्यक्तिमत्व विकासासाठी कौशल्य विकास आवश्यक : सुधीर मुनगंटीवार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन

देशाला प्रगतीपथावर नेण्यासाठी विद्यार्थ्यांनी निष्ठेने कार्य करावे. विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी त्यांच्यातील कौशल्याचा विकास होणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन वित्त, नियोजन आणि वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज येथे केले.
[amazon_link asins=’B075FY4RWK’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’49e9efc8-9cbd-11e8-8a96-07e81989f8fc’]

किवळे येथील सिंम्बायोसीस स्कील अँड ओपन युनिव्हरसीटीला वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज भेट देऊन तेथील कौशल्य विकास अभ्यासक्रमावर आधारीत विविध प्रयोगशाळांची पाहणी केली. यावेळी आयोजित कार्यक्रमात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. सिंम्बायोसीस स्कील अँड ओपन युनिव्हरसीटीचे कुलपती डॉ.शां.ब.मुजुमदार, कुलगुरु डॉ.स्वाती मुजुमदार यावेळी उपस्थित होते.

यावेळी सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, देशाला प्रगतीपथावर नेण्यासाठी विद्यार्थ्यांनी कौशल्य विकासावर आधारीत शिक्षण घेणे काळाची गरज आहे. कौशल्य विकासात समयसूचकतेला महत्व आहे. जगाला जिंकण्यासाठी ज्ञानाची गरज आहे, त्यासाठी विद्यार्थ्यांनी प्रत्येक काम निष्ठेने करायला हवे.