मोदी ऐवजी गाडगे बाबांचा फोटो वापरण्याची आवश्यकता : सुप्रिया सुळे

 पुणे: पोलीसनामा ऑनलाइन  
केंद्र सरकारच्या सर्व शिक्षा अभियाना अंतर्गत विद्यार्थ्यांना स्वच्छतेचा संदेश ‘चाचा चौधरी आणि मोदी’या पुस्तकातून देण्यात आला आहे. त्या पुस्तकात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे फोटो वापरण्यात आले आहेत. मात्र मोदी ऐवजी संत गाडगे बाबा महाराजाचा फोटो वापरण्याची आवश्यकता होती.अशी ईच्छा खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली.

यावेळी खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या की, ‘चाचा चौधरी आणि मोदी’या पुस्तकाचे वाटप विद्यार्थ्यांना करण्यात आले आहे. मात्र या पुस्तकात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सर्व ठिकाणी फोटो वापरले आहेत. याद्वारे पुढील पिढीला काय संदेश देणार आहोत, हे स्पष्ट होत असून यामधून सरकारची मानसिकता दिसत आहे. या तरुणपिढीला आणि विशेषतः स्वच्छते बाबतच्या पुस्तकामध्ये संत गाडगे बाबा किंवा इतर कोणत्याही महापुरुषांचे फोटो वापरण्याची आवश्यकता होती. मात्र या भाजप सरकारने देशातील प्रत्येक कानाकोपऱ्यात ज्या प्रकारे जाहिरातीचा सपाटा सुरु केला आहे. तसाच आता मुलांमध्ये देखील मोदींच्या पुस्तकाच्या माध्यमातून त्यांचे विचार आणि जाहिरात करण्याचे काम हे सरकार करीत आहे. ही दुर्वेवी बाब असून आजअखेर कोणत्याही सरकारने पंतप्रधानांची जाहीरात केली नसल्याचे सांगत त्यांनी भाजपच्या या कृतीचा निषेध व्यक्त केला.