Coronavirus : पुणेकरांना मेडिकल इमर्जन्सीसाठी तातडीनं सेवा देण्यासाठी 180 रिक्षांची निवड, ‘या’ क्रमांकावर करा ‘कॉल’

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – जर पुणेकरांना मेडिकल इमर्जन्सीसाठी तातडीने रिक्षा हवी असेल तर जिल्हा प्रशासनाकडून रिक्षा उपलब्ध करून देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. पुणे शहरात ही व्यवस्था पुरविणासाठी जवळपास १८० रिक्षा निवडण्यात आल्या आहेत.

नागरिकांना जर मेडिकल इमर्जन्सी असेल तर *९८५९१ ९८५९१ या क्रमांकावर फोन करावा. तसेच अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना देखील ही रिक्षा कामावर जाण्यासाठी तत्पर असणार आहे, मात्र त्यासाठी मीटरने पैसे द्यावे लागतील. दरम्यान राहुल शितोळे यांनी माहिती दिली की, हा उपक्रम रिक्षा पंचायत, ऑटो ग्लाइड, पुणे ऑटो रिक्षा फेडरेशन, आरटीओ, वाहतूक पोलीस आणि बाबा शिंदे यांच्यातर्फे राबविण्यात येत आहे.

जवळपास साडेतीन हजार पुणेकरांनी मंगळवारी या रिक्षांसाठी संपर्क साधला. त्यापैकी बहुतेक लोकांना विमानतळावर जायचे होते, कारण विमान सेवा बुधवारपासून बंद करण्यात आली आहे. दरम्यान बुधवारी देखील जवळपास १ हजार लोकांनी या रिक्षांना संपर्क साधला, त्यापैकी काही लोकांना वैद्यकीय उपचारासाठी डॉक्टरांकडे जायचे होते. विशेष म्हणजे कोरोना विषाणूच्या बचावासाठी प्रत्येक रिक्षात सॅनिटायझर उपलब्ध करण्यात आले आहे. तसेच या रिक्षात दोन प्रवाशांपेक्षा अधिक प्रवासी नसतील.

तसेच शितोळे यांनी सांगितले आहे की, जिल्हा प्रशासन आणि वाहतूक पोलिसांनी दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करून प्रवाशांना रिक्षा उपलब्ध करून देण्यात येत आहेत.

You might also like