देश चालवायला ५६ पक्ष नाही तर ५६ इंचाची छाती लागते : देवेंद्र फडणवीस

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन – देश चालवायला ५६ पक्ष नाही लागत ५६ इंचाची छाती लागते. २६/११ झाल्यावर सरकारने फक्त निषेध केला आणि आम्ही उरी, पुलावामानंतर बदला घेतला, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हंटले. आगामी लोकसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली असल्याने आज शिवसेना-भाजप युतीच्या प्रचाराचा नारळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांयकाळी ५ वाजता कोल्हापुरात आंबाबाईचे दर्शन घेऊन फोडला आहे. जिल्ह्यातील तपोवन मैदानावर युतीच्या सभेचे नियोजन करण्यात आले होते. यावेळी आदित्य ठाकरे, शिवसेनेचे उमेदवार आणि आमदार तसेच चंद्रकांत पाटील, रामदास आठवले आणि भाजप पदाधिकारी उपस्थित होते.

आगामी लोकसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. सर्व पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. दरम्यान, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची अंबाबाईवर श्रद्धा होती. बाळासाहेब ठाकरेही नेहमी प्रचाराची सुरुवात कोल्हापुरातून करायचे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे कोल्हापुरात आंबाबाईचे दर्शन घेऊन फोडला आहे. कोल्हापुरातील तपोवन या मैदानावर युतीच्या सभेचे नियोजन करण्यात आले होते.

आमचे सैन्य छत्रपतींच्या सैन्यासारखे आहे. महाराजांची सेना ही देव, देश आणि धर्मासाठी लढते. देश चालवायला ५६ पक्ष नाही लागत ५६ इंचाची छाती लागते. २६/११ झाल्यावर सरकारने फक्त निषेध केला आणि आम्ही उरी, पुलावामानंतर बदला घेतला. बदला घेतल्यानंतरही हे काँग्रेस – राष्ट्रवादीचे नेते बदला का घेतला म्हणून विचारतात, उत्तर देऊनही प्रश्न सुटत नाहीत, आहो जे दहशतवादी माझ्या देशाचे लचके तोंडात आहेत त्यांचा बदला नाही घ्यायचा तर काय करायचा असेही त्यांनी म्हंटले.

याचबरोबर, बोलतांना त्यांनी आघाडीवर जोरदार टीकाही केली. जर भाजपा – सेना इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी आहे तर तुमची आघाडीची भ्रष्टाचार कंपनी आहे. आघाडीच्या १५ वर्षांच्या कालावधीपेक्षा युतीने गेल्या साडेचार वर्षात जास्त काम केले आहे. आघाडीमुळे सामान्य माणूस सामान्यच राहिला. पश्चिम महाराष्ट्रात आघाडीच्या तुलनेत युतीने जास्त विकास केला. पंतप्राधान आवास योजनेच्या माध्यमातून गरीबांना घर मिळाले. उज्वलाच्या माध्यमातून गरीबांच्या घरी गॅस मिळाला, गरीबी हटाओचे नारे देऊन काँग्रेस नेत्यांची गरीबी हटली. महाराष्ट्रात युती आणि देशात एनडीचे सरकार येणार म्हणून कॅप्टननेच माढ्यातून माघार घेतली. केवळ नावात राष्ट्रवादी म्हटल्याने राष्ट्रवादी होत नाही. अशीही टीका त्यांनी यावेळी केली.

विशेष म्हणजे, हातकंणगले लोकसभा मतदार संघात युवा चेहरा दिला आहे. सुर्यावर थुंकल्यास आपल्याच चेहर्‍यावर थुंकी उडते. शेतकरी, सामान्य माणसांच्या मागे समर्थपणे आमचे सरकार उभे आहे. आजपर्यंत जे कोणीही केले नाही ते मोदींनी केले. आघाडीचे काय चाललंय तेच कळत नाही. चंद्रपूरपासून कोल्हापूरपर्यंत भगवा फडकावा हे आई जगदंबेकडे मागणं असून कोल्हापूर हे आमचे शक्तिपीठ आहे असेही त्यांनी म्हंटले.

युतीच्या सभेसाठी मोठ्या प्रमाणावर जन करण्यात आले असून सभेला राज्यभरातून कार्यकर्ते उपस्थित झाले होते. याचबरोबर शहरातील प्रमुख चौकात स्क्रीन्स लावण्यात आल्या होत्या.