Coronavirus : पुणे ‘मनसे’च्या वतीने गरजूना धान्याची पॅकेट्स

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  कोरोना वायरस च्या पार्श्वभूमीवर देशभरात आजपासून लागू करण्यात आलेल्या संचारबंदीच्या पार्श्वभूमीवर हातावर पोट असलेला सर्वसामान्य माणूस उपाशी राहू नये यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना मदतीसाठी सरसावली आहे. याचाच एक भाग म्हणून मनसेच्या पुणे शहर विभागाच्या वतीने अन्न धण्याची पार्सल तयार करून कार्यकर्त्यांच्या माध्यमातून गरजूना घरपोच नेऊन दिली जात आहेत, अशी माहिती मनसेचे नेते बाबू वागसकर यांनी दिली.

वागसकर म्हणाले, की कोरोनाचे संकट मोठे आहे. ते रोखण्यासाठी सर्व पातळ्यांवर प्रयत्न सुरू आहेत. याचाच एक भाग म्हणून देशभरात तीन आठवड्यांसाठी संचारबंदी लागू करण्यात आली आहे. याचा परिणाम सर्वच क्षेत्रावर होणार आहे. विशेषतः हातावर पोट असलेल्या सर्वसामान्य कुटुंबांना याचा मोठा फटका बसत आहे. यासाठी मदतीचा म्हणून शहर मनसेचे अध्यक्ष अजय शिंदे यांच्या नेतृत्वाखाली अशा गरजू कुटुंबांना पाच किलो गहू, एक किलो तूरडाळ, एक किलो हरभरा आणि पाच किलो तांदूळ असलेले पॅकेट / पार्सल करून देण्यात येत आहे.

कार्यकर्त्यांच्या माध्यमातून अशा गरजवंत नागरिकांची माहिती घेऊन पहिल्या टप्प्यात एक हजार पॅकेट चे वाटप करण्यास सुरुवात केली आहे. पुढील टप्प्यात याची संख्या वाढवण्यात येईल, असे वागसकर यांनी नमूद केले.

You might also like