जगातील सर्वात लांब केसांची मुलगी नीलांशी पटेलने ‘या’ चांगल्या कामासाठी कापले आपले 6 फुट लांब केस

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – केसांचे सौंदर्य आणि त्यांच्या लांबीच्या बळावर भारताच्या नीलांशी पटेलने गिनीज बुकमध्ये आपले नाव नोंदवून मोठी प्रसिद्धी मिळवली होती. परंतु तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की, जगात सर्वात लांब केसांचा विक्रम करणार्‍या भारताच्या नीलांशी पटेलने आपले लांब केस कापले आहेत. अखेर नीलांशी पटेलने असे का केले ते जाणून घेवूयात…

हे आहे कारण
गुजरातच्या मोडासा येथे राहणार्‍या नीलांशीने सांगितले की, ती अपले 6 फुटांपेक्षा लांब केस कापून यूएसएच्या एका म्युझियममध्ये पाठवत आहे. ती आपले केस कॅन्सरशी लढणार्‍या मुलांसाठी दान करत आहे. तिने म्हटले, मी असे यासाठी करत आहे की लोक या महान उद्देशासाठी माझ्याकडून प्रेरणा घेऊन पुढे येतील आणि कॅन्सरग्रस्त मुलांसाठी केस दान करतील. नीलांशीने सांगितले की, तिची आई सुद्धा तिचे केस कापून या मुलांसाठी दान करणार आहे.

गिनीज बुकमध्ये दोनवेळा नाव नोंदले
6 ऑगस्ट 2002 मध्ये जन्मलेल्या नीलांशीचे लांब केसामुळे 2018 मध्ये पहिल्यांदा गिनीज बुकमध्ये नाव नोंदले गेले. इटलीमध्ये या संबंधीत झालेल्या कार्यक्रमात नीलांशीच्या केसांची लांबी 5 फुट 7 इंच होतील. इतक्या लांबसडक केसांमुळे नीलांशीने टीन एजर गर्लचा विक्रम मोडला होता. यानंतर सप्टेंबर 2019 मध्ये नीलांशीच्या केसांची लांबी 6 फुट 3 इंच झाली, तेव्हा दुसर्‍यांदा गिनीज बुकमध्ये तिचे नाव नोंदले गेले. यासोबतच नीलांशी जगातील सर्वात लांब केसांची मुलगी बनली होती.