उन्हाळ्यात करा कडुलिंबाचा वापर ; ‘हे’ होतील फायदे

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कडुलिंब या झाडाची पानं, फळं आणि मुळांमध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत. त्याच्या नावातच कडू हा शब्द असल्याने त्याची चवही कडूच आहे. मात्र आरोग्यासाठी हे अतिशय गुणकारी आहे. उन्हाळ्यामध्ये कडुलिंब अत्यंत फायदेशीर ठरतं. उन्हाळ्यामध्ये होणाऱ्या स्किन अ‍ॅलर्जी, खाज किंवा रॅशेजसारख्या समस्यांवर कडुलिंबाचा वापर केल्यास त्याचा खूप फायदा होतो.

उन्हामध्ये टॅनिंगची समस्या उद्भवली असेल तर कडुलिंबाची पानं उकळून, पाणी थंड करा. या पाण्याने चेहरा स्वच्छ केल्यास टॅनिंगची समस्या दूर होऊन चेहऱ्याची त्वचा उजळ्यास मदत होते. धूळ आणि वातावरणातील दूषित घटक त्वचेवर चिकटल्याने स्किन इन्फेक्शन किंवा रॅशेज येतात. त्यासाठी तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये कडुलिंबाची पानं एकत्र करू शकता. पण त्याआधी पानं धुवून घ्या. जेणेकरून त्यांच्यावरील धूळ निघून जाईल आणि काही वेळासाठी पाण्यामध्ये तशीच राहू द्या. त्यानंतर त्या पाण्याने आंघोळ करावी. सतत खाज येत असल्यास कडुलिंबाची पानं दह्यासोबत वाटून त्या जागेवर लावा. लगेच आराम मिळतो.

एखादी जखम झाल्यास कडुलिंबाच्या पानांचा लेप लावल्याने फायदा होतो. यासाठी ऑलिव्ह ऑइलसोबत कडुलिंबाच्या पांनाची पेस्ट तयार करून लावा. मलेरिया झाल्याने कडुलिंबाच्या झाडाची साल पाण्यामध्ये उकळून त्याचा काढा प्यायल्याने फायदा होतो. त्वचेच्या समस्यांवर कडुलिंबाच्या तेलाचा वापर करणं लाभदायक ठरतं. कडुलिंबाच्या तेलामध्ये थोडासा कापूर एकत्र करून शरीरावर मालिश केल्याने त्वचेच्या सर्व समस्या दूर होतात. कडुलिंबाच्या खोडामध्ये खोकला, बद्धकोष्ट आणि पोटोच्या समस्या दूर करणारे गुणधर्म असतात. डोकेदुखी, दातदुखी, हातापायांना होणाऱ्या वेदना आणि छातीमध्ये होणाऱ्या वेदना दूर करण्यासाठी कडुलिंबाचं तेल मदत करतं. आयुर्वेदामध्ये कडुलिंबाचे अनेक औषधी गुणधर्म नमूद केले आहेत. धार्मिक विधींमध्येही याशिवाय कडुलिंबांचा उपयोग होतो. अनेक समारंभांमध्येही कडुलिंबाचा वापर होतो. शिवाय आरोग्यासाठी अनेक गुणकारी फायदे आहेतच.