Advt.

जेव्हा प्रेग्नंट नीना गुप्ताकडे नव्हते डिलिव्हरीसाठी पैसे, अकाऊंटमध्ये होते केवळ 2 हजार

नवी दिल्ली : बॉलीवुड अभिनेत्री नीना गुप्ताची ऑटोबायोग्राफी सध्या चर्चेत आहे. हे पुस्तक नीना गुप्ताच्या जीवनातील अनेक रहस्य उघड करते. नीनाची मुलगी मसाबाने इंस्टावर ऑटोबायोग्राफीच्या निवडक ओळी शेयर केल्या आहेत, जिथे नीना गुप्ताची प्रेग्नंसी आणि त्या दरम्यान असलेल्या आर्थिक तंगीचा उल्लेख आहे.

जेव्हा नीना गुप्ता मसाबाला जन्म देणार होती तेव्हा तिच्या अकाऊंटमध्ये इतके पैसे नव्हते की, ती ऑपरेशन करू शकली असती. नीनाच्या अकाऊंटमध्ये त्यावेळी केवळ 2 हजार रुपये होते.

ऑटोबायोग्राफीमध्ये लिहिले आहे – जस-जसी माझी डिलिव्हरीची वेळ जवळ येऊ लागली, माझी चिंता वाढू लागली होती. कारण माझ्या अकाऊंटमध्ये थोडेच पैसे होते. तेव्हा मला मुलाचा नैसर्गिक जन्मच परवडू शकत होता. कारण त्यासाठी 2 हजार रुपये लागू शकले असते.

परंतु मला माहित होते की, जर मला सी-सेक्शन करावे लागले तर अडचणीत येऊ शकते. कारण सर्जरीची किंमत 10 हजार होती. नशीबाने माझ्या डिलिव्हरीच्या काही दिवस अगोदर मला टॅक्स रिम्बर्समेंटचे 9000 रुपये मिळाले. तेव्हा माझ्या अकाऊंटचा बॅलन्स 11 हजार झाला. चांगले झाले की हे पैसे मला मिळाले. कारण मला माझ्या डॉक्टरने सांगितले होते की, माझे ऑपरेशन होईल.

आपल्या आईच्या जीवनातील संघर्ष शेयर करत मसाबाने पोस्टमध्ये सांगितले की, आईची बायोग्राफी वाचून खुप काही शिकायला मिळाले आहे. मसाबाने लिहिले की, ती रोज जोरदार मेहनत करते कारण ती जे डिझर्व्ह करते ते कुणी हिसकावू नये. या जगात आणल्या बद्दल मी माझ्या आईचे आभार मानते.

मसाबाचे वडील माजी वेस्ट इंडीज क्रिकेटर व्हिव्हियन रिचर्डस आहेत. नीना आणि व्हिवचे अफेयर होते. परंतु नंतर त्यांचे नाते तुटले होते. त्याने लग्न सुद्धा केले. मसाबाचे आपल्या वडीलांशी चांगले संबंध आहेत. तर नीनाने विवेक मेहरासोबत लग्न केले.