नीनाला ट्रोलर्सनी म्हणाले – ‘बुढ़िया’, अभिनेत्रीने दिले चोख प्रत्युत्तर

पोलीसनामा ऑनलाईन : बॉलिवूड अभिनेत्री नीना गुप्ता आजकाल उत्तराखंडमध्ये वेळ घालवत आहे. ती अनेकदा तिचे व्हिडिओ आणि फोटो शेअर करते, जे तिच्या चाहत्यांना आवडतात. त्याच वेळी, काही ट्रोलर्स वय आणि कपड्यांसह तिला ट्रोल करत असतात. आता नीनाने तिचा एक व्हिडिओ सामायिक करून ट्रोलर्सला चोख प्रत्युत्तर दिले आहे.

व्हिडिओमध्ये नीना गुप्ता व्हाईट शर्ट आणि धोती पँटमध्ये दिसली आहे. तिने शर्टवर काळ्या रंगाचा कोट घातला आहे ज्यामध्ये ती बरीच स्टायलिश दिसत आहे. यासह तिने काळे शूज परिधान केले आहेत. व्हिडिओमध्ये नीना म्हणते, ‘हाय, ही माझी स्टाईल आहे. तुम्हाला माझी स्टाईल आवडली का? बोलून टाका मला, म्हातारी आहे, या वयात काय करीत आहेस? ही माझी स्टाईल आहे आणि मला ती खूप आवडते. आशा आहे की तुम्हालाही ते आवडेल. कारण मी ही स्टाईल करू शकते, ‘पचायत’ देखील करू शकते, ‘मसाबा-मसाबा’ देखील करू शकते आणि ‘बधाई हो’ देखील करू शकते. तीही माझी स्टाईल आहे आणि ही देखील माझी स्टाईल आहे. नाही का?’

दरम्यान, नीना गुप्ता अलीकडेच नेटफ्लिक्स सीरीज मसाबा-मसाबामध्ये दिसली होती. यात तिने मुलगी मसाबा गुप्तासोबत स्क्रीन शेअर केली. या वेब सीरिजमध्ये ‘आंटी किसको बोला बे’ हे गाणे प्रसिद्ध करण्यात आले जे खूप लोकप्रिय झाले. या गाण्यात निनाच्या ग्लॅमरस स्टाईलचे खूप कौतुक झाले.