‘हॉट’ फोटोशुट बाबत अभिनेत्री नीना गुप्ता म्हणतात, ‘माझ्या ‘त्या’ फोटोंवर सर्वाधिक कमेंट्स येतात’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन –  नॅशनल अ‍ॅवार्ड विनर नीना गुप्ता यांना वयाच्या ६० व्या वर्षी बधाई हो. या सिनेमात साकारलेल्या रोलमुळे जीवनदान मिळालं आहे. परंतु नीना गुप्ता आपल्या शानदार अदाकारीपेक्षा आपल्या बोल्ड फॅशन आणि स्टाईलमुळे चर्चेत असतात. बोल्ड फॅशन स्टाईलमधील नीना गुप्ता यांचा अंदाज खूपच कूल वाटतो. त्यांचे अनेक फोटो सोशलवरून समोर येत असतात.

एका मुलाखतीत त्यांना प्लंगिंग नेक लाईन, थाईहाय स्लिट ड्रेसबद्दल विचारण्यात आलं की, यंग अ‍ॅक्ट्रेसचा रोल मिळवण्यासाठी ते हे सगळं करतात का ? यावर बोलताना नीना गुप्ता म्हणाल्या की, “मला यापेक्षा यंग रोल तर नाही मिळाले. परंतु मी खुश आहे की, मला ईश्वराने चांगलं शरीर दिलं आहे. मी फॅशनला घेऊन खूपच कॉन्शियस असते. माझ्या हॉट फोटोंना मोठ्या प्रमाणात कमेंट मिळत असतात.”

नीना गुप्ता यांनी सांगितलं की, “नॉर्मल फोटोवर इतक्या सगळ्या कमेंट नाही येत. परंतु हॉट फोटो असेल तर त्यावर मात्र खूप कमेंट येतात. मी हे सगळं काही आणि सोशल मीडियावर राहणं खूप एन्जॉय करते. मला खूप कमी निगेटीव कमेंट मिळतात.” असेही त्या म्हणाल्या.

नीना गुप्ता वेळेनुसार, खूपच फॅशनेबल झाल्या आहेत. त्यांच्या साडीपासूनचे तर वनपीसपर्यंतचे सर्व फोटो नेहमीच चर्चेत असतात. त्यांची मुलगी मसाबा एक प्रसिद्ध फॅशन डिझायनर आहे. नीना गुप्ता यांची अदाकारी, बिंधास्त अंदाज, आणि डिझाईन ड्रेसेस चाहत्यांना विशेष आवडतात.

आरोग्यविषयक वृत्त – 

पाणी पिण्याबाबत आहेत अनेक गैरसमज, जाणून घ्या सत्य 

निरोगी आरोग्य जगण्यासाठी ‘या’ पदार्थांचा करा आहारात समावेश 

चवीने खाल्ले जाणारे मैद्याचे पदार्थ आरोग्यासाठी ‘घातक’ 

सावधान ! मधुमेहाच्या रूग्णांचे शुगरफ्रीमुळे वाढू शकते वजन