नीरा : दत्तजयंती उत्साहात साजरी

नीरा : पोलीसनामा ऑनलाइन – श्री. दत्त देवस्थान नीरा – पाडेगांव येथे गुरुचरित्र पारायण, रुद्राभिषेक, अभिषेक, पुष्पांजली आदी कार्यक्रमांनी दत्तजयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

पुणे व सातारा जिल्ह्याच्या सीमेवरील नीरा नदी तीरावर असलेल्या श्री. दत्त देवस्थान नीरा – पाडेगांव या ठिकाणी सालाबादप्रमाणे सोमवारी (दि.९) पासून ते गुरुवार (दि.१२) पर्यंत श्री. दत्त जन्मोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. बुधवारी (दि.११) सकाळी १० ते १ वाजेपर्यंत श्रींस रुद्राभिषेक कार्यक्रम पार पडला. तसेच संध्याकाळी पाच ते सहा या वेळेत ह.भ.प.नारायण महाराज गोसावी (सासवडकर) यांचे श्री. दत्तजन्म चरित्र किर्तन झाल्यानंतर ‘दिगंबरा दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा’च्या जयघोषात श्री.दत्त जन्म सोहळा पार पडला .

गुरुवारी (दि.१२) सकाळी आठ ते साडे नऊ वाजेपर्यंत श्रींस. रुद्राभिषेक व त्यानंतर ह.भ.प. शिवाजीराव भोसले ( माहूर- खंडाळा ) यांचे काल्याचे कीर्तन होणार आहे. तसेच सकाळी साडे अकरा ते साडे बारा वाजेपर्यंत श्रीं.ची पालखी प्रदक्षिणा, मिरवणूक व त्यानंतर दुपारी एक वाजता महाप्रसाद होऊन कार्यक्रमाची सांगता होणार आहे.

Visit : policenama.com

 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like