नीरेत साधेपणाने लाडक्या गणरायाचे स्वागत !

नीरा : पोलीसनामा ऑनलाइन  –  नीरा (ता.पुरंदर) येथे दरवर्षी जल्लोषात व वाजत गाजत बाप्पांचे स्वागत होत असताना यंदा मात्र उत्साह असताना देखील कोरोनाच्या संकटामुळे कोणताही ढोल-ताशांंचा डाम-डौल व गाजा वाजा न करता घरोघरी अत्यंत साधेपणाने गणपती बाप्पा मोरयाच्या गजरात लाडक्या गणरायाचे स्वागत करण्यात आले. परंतु नीरा गावात प्रथमच एक गांव एक गणपतीची संकल्पणा राबविली जात आहे.

कोरोणाच्या संकटामुळे राज्य सरकारने

गणेशोत्सवाकरिता काही नियम व अटी घालून दिलेल्या असल्याने गणेश भक्तांच्या आनंदावर व उत्साहावर विरजण पडले आहे. त्यामुळे शासनाच्या नियम व अटींचे पालन करीत ढोल -ताशांचा डाम-डौल न करता घरोघरी लाडक्या बाप्पांचे साधेपणाने स्वागत करण्यात आले.

कोरोणाच्या संकटामुळे यंदा नीरा येथील बाजारतळावर गणेश मुर्तींची , सजावटीचे साहित्य खरेदी व विक्री साठी स्टाँल लावण्यात आले होते..या वर्षी घरगुती गणेशाची स्थापणा करण्याचा मुहूर्त दुपारी १.५७ मिनिटांपर्यंत होता त्यामुळे घरोघरी गणेश मुर्ती खरेदीसाठी सकाळी आठ वाजल्यापासून दुपारी एक वाजेपर्यंत नागरिकांनी कोरोणाची भिती बाळगत खरेदी केली. त्यानंतर मात्र बहुतांश गर्दी कमी झाली होती.
दरवर्षी पेक्षा या वर्षी छोट्या- छोट्या मंडळांंना परवानगी नसल्याने व कोरोनाचे व मंदीच्या सावटामुळे गणेश मुर्तींच्या विक्रीवर त्याचा परिणाम झाल्याचे मुर्तीकार उदय लोणकर , दत्तात्रय कुंभार यांनी सांगितले. तर सजावटीच्या वस्तू, सुगंधी अगरबत्ती, धुुुप, अत्तर, रूमाल, नैवेद्यासाठी ठेवण्यात येणारी फळे यांंच्याही स्टाँलची संख्या चांगली होती. या व्यवसायाला मंदीचा फटका बसल्याचे व्यावसायिकांनी सांगितले.

चौकट

नीरेत प्रथमच ‘एक गांव एक गणपती’
संकल्पणा……

जेजुरी पोलिसांनी ‘एक गांव एक गणपती ‘ संकल्पणा राबविण्याचे नीरा येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांंना आवाहन केले होते. त्याला मंडळाच्या पदाधिका-यांनी प्रतिसाद देत नीरेच्या प्रथमच ‘एक गांव एक गणपती ‘ ची संकल्पणा राबविण्याचा निर्णय घेतला. परंतु बहुतांश मंडळांंनी श्रींच्या मुर्तींचे अगोदरच बुकिंग केल्यामुळे नीरा गावातील मानाच्या सार्वजनिक गणेश मंडळांंच्या श्रींच्या मुर्तींची प्रतिष्ठापणा संध्याकाळी नीरा पोलिस दुरक्षेत्राच्या आवारात उभारलेल्या मंडपात करण्यात आल्याचे नीरेचे पोलिस पाटील राजेंद्र भास्कर यांनी सांगितले.