नीरेच्या कन्याशाळेचा बारावीचा निकाल १०० टक्के तर किलाचंद ज्यु.कॉलेजचा निकाल ९५.२५ टक्के

नीरा : पोलीसनामा ऑनलाईन (मोहंम्मदगौस आतार) – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या बारावीच्या परिक्षेचा ऑनलाईन निकाल गुरूवारी (दि.१६) दुपारी एक वाजता जाहीर करण्यात आला. नीरा केंद्राचा निकाल ९६.९५ टक्के लागला आहे. दरम्यान, नीरा येथील सौ.लि.रि.शहा मुलींच्या ज्युनिअर कॉलेजचा निकाल १०० टक्के निकाल असून मुलींच्या कॉलेजने उज्वल निकालाची परंपरा कायम राखली आहे .तर किलाचंद ज्युनिअर कॉलेजचा ९५.२५ टक्के लागला आहे.
नीरा (ता.पुरंदर) येथील सौ. लिलावती रिखवलाल शहा मुलींच्या ज्युनिअर कॉलेजचा बारावी विज्ञानचा निकाल १०० टक्के लागला असून प्रथम क्रमांक स्नेहा सचिन नरूटे – ६१.५० टक्के, द्वितीय क्रमांक सायली नामदेव धुमाळ – ५७ टक्के तर तृतीय क्रमांक साक्षी दत्तात्रय निगडे – ५४.६० टक्के गुण मिळवून मुलींच्या कॉलेजचे नांव उज्वल केले.

किलाचंद ज्युनिअर कॉलेजच्या विज्ञान शाखेचा निकाल ९९.३० टक्के लागला असून खालील विद्यार्थींनी नीरा केंद्रात विज्ञान शाखेत व कॉलेजमध्ये प्रथम तीन क्रमांक प्राप्त केला आहे. प्रथम क्रमांक -मिसबाह सलिम शेख – ८३.६९ टक्के, द्वितीय क्रमांक- गौरव दादा जाधव – ७८.७६ टक्के तर तृतीय क्रमांंक अभिषेक समीर पवार – ७६.१५ टक्के विद्यार्थ्यांनी प्रथम तीन क्रमांक पटकाविला.

तर कला शाखेचा निकाल ८९.९० टक्के लागला असून प्रथम क्रमांक – शिवम अर्जुन जगदाळे – ८८.३० टक्के, द्वितीय क्रमांक- धनश्री संजय काकडे – ८७.०७ टक्के तर तृतीय क्रमांक -पल्लवी महादेव जाधव – ८५.२३ टक्के मिळवून या विद्यार्थ्यांनी प्रथम तीन क्रमांक येण्याचा मान पटकविला आहे. यशस्वी सर्व विद्यार्थी व विद्यार्थींनींचे किलाचंद ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य गोरख थिटे , सौ.लिलावती रिखवलाल शहा ज्युनिअर कॉलेजच्या प्राचार्या सुरेखा बोडरे, शाळेचे शिक्षक, स्कूल कमिटीचे पदाधिकारी व ग्रामस्थांनी अभिनंदन केले आहे.