Neeraj Chopra Diet | सालमन फिश-चिकन आणि ब्रेड ऑमलेट, ‘या’ गोष्टींमध्ये दडलंय नीरज चोपडाच्या ताकदीचं ‘गुपित’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Neeraj Chopra Diet | टोकियो ऑलम्पिकमध्ये नीरज चोपडाने 87.58 मीटरचा थ्रो करून भारताला 13 वर्षानंतर गोल्ड मेडल जिंकून दिले. यापूर्वी सुद्धा नीरज कॉमनवेल्थसह अनेक मोठ्या इव्हेन्टमध्ये गोल्ड मेडल जिंकले आहे. एका अ‍ॅथलीटसाठी इतक्या मोठ्या कालावधीपर्यंत आपल्या शरीराला या लेव्हलपर्यंत मेंटेन ठेवणे खुप अवघड काम आहे. देशाचा लाडका भालाफेक खेळाडू नीरज कोणत्या डाएट प्लानद्वारे (Neeraj Chopra Diet) आणि वर्कआऊटद्वारे स्वताला मेंटेन ठेवतो, ते जाणून घेवूयात…

आपल्या मांसपेशी मजबूत ठेवण्यासाठी नीरज रोज सकाळी नियमितपणे वर्कआऊट सेशन पूर्ण करतो. सोशल मीडियावर नीरजने स्क्वॉट्स, पुलअप्स, पुशअप्स, ट्रायसेप्स आणि डेड लिफ्ट सारखे वर्कआउट करतानाचे आपले अनेक व्हिडिओ अपलोड केले आहेत.

मजबूतीसह शरीराच्या फ्लेक्सिबिलिटीकडे सुद्धा तो लक्ष देतो. तो घर, जिम किंवा फील्डवर नेहमी अशा एक्सरसाइज करतो ज्यामुळे बॉडी लवचिक राहिल. असे केल्याने कोणत्याही अ‍ॅथलीटला इंज्यूरी होण्याची शक्यता कमी होते.

जिम आणि फील्डवर घाम गाळल्यानंतर नीरजच्या शरीराला इन्स्टंट एनर्जी आणि भरपूर प्रोटीनची आवश्यकता असते. याचा उल्लेख त्याने काही दिवसांपूर्वी दिलेल्या मुलाखतीमध्ये केला होता.

नीरज चोपडाने सांगितले होते की, त्याला ब्रेड ऑमलेट खायला आवडते आणि तो आठवड्यात कधीही ब्रेड ऑमलेट खातो. ब्रेकफास्टमध्ये अ‍ॅथलीटला उकडलेली अंडी खाण्यास सांगितले जाते, परंतु नीरज याबाबतीत चवीला सुद्धा थोडे प्राधान्य देतो.

नीरजने सांगितले की, तो कधी-कधी आपल्यासाठी व्हेज बिर्याणीसुद्धा बनवतो. ही व्हेज बिर्याणी तो स्वता बनवतो. ती पौष्टिक असतेच शिवाय अतिशय चविष्ठ असते.

टूर्नामेंट किंवा मॅचच्या दरम्यान खुप जास्त फॅट असलेल्या जेवणापासून दूर राहतो.
या दरम्यान तो सलाड किंवा फळे जास्त सेवन करतो.
तो डाएटमध्ये उकडलेली अंडी आणि ग्रिल चिकन ब्रेस्टसुद्धा खातो.
या सर्व गोष्टींमुळे त्याच्या शरीराला आवश्यक प्रोटीन मिळतात.

नीरजने सांगितले होते की, आपल्या डाएटमध्ये तो सालमन फिश सुद्धा खातो.
ते आरोग्यासाठी खुप चांगले असते.
त्याने काही दिवसांपूर्वीच आपल्या डाएटमध्ये याचा समावेश केला आहे.
आपल्या वर्कआऊट सेशननंतर तो ताजी फळे आणि ज्यूस आठवणीने घेतो.

तुम्ही ऐकून हैराण व्हाल की ’गोल्डन बॉय’ला पाणीपुरी सुद्धा खायला आवडते.
नीरज म्हणतो, पाणीपुरी खाल्ल्याने आपल्या शरीराला कोणतेही नुकसान होत नाही.
त्याला वाटते की, हा असा पदार्थ आहे जो शरीरात पाण्याची कमतरता होऊ देत नाही.

नीरज म्हणतो, पाणीपुरीत केवळ पाणी असते आणि ती खाल्ल्याने पोट पाण्याने भरलेले राहते.
एक अ‍ॅथलीट असल्याने हे रोज खाण्याचा सल्ला मी देत नाही. परंतु कधी-कधी खाऊ शकता.

नीरजने सांगितले की, त्याला त्याच्या आईने बनवलेला चूरमा खुप आवडतो.
चूरमा एक गावाकडील पदार्थ आहे जो चपाती, साखर आणि भरपूर तूपासोबत बनवला जातो.
सामान्यपणे आखाड्यात पहिलवानकी करणारे हा पदार्थ खातात.

नीरजने सांगितले की, देशाच्या बाहेर जर एखादी टूर्नामेंट असेल तर तो तेथील पदार्थच खाणे पसंत करतो.
मात्र तो परदेशी खेळाडूंना चिकन करी किंवा बटर चिकन सारख्या चविष्ठ डिश खाण्याचा सुद्धा सल्ला देतो.

Web Title :- Neeraj Chopra Diet | neeraj chopra won gold medal in tokya olympic know about his workout and diet plan

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Accident News | दुर्देवी ! दोन दुचाकीचा भीषण अपघात, दोघांचा जागीच मृत्यू

DGP Sanjay Pandey | 190 सहाय्यक निरीक्षकांना (API) पोलिस निरीक्षकपदी (PI) बढती लवकरच, DGP संजय पांडे यांची Facebook Live मध्ये माहिती (व्हिडिओ)

Belly Fat | पोटाची चरबी कमी करण्यासाठी आयुर्वेदिक फॉर्म्युला, लठ्ठपणा होईल कायमचा दूर; जाणून घ्या