Neeraj Chopra | ’हिंदी में पूछ लो जी’….नीरज चोपडाने जेव्हा अँकरला म्हटले, व्हिडिओ सोशल मीडियावर वायरल (व्हिडिओ)

नवी दिल्ली :वृत्त संस्था – नीरज चोपडा (Neeraj Chopra) च्या एका जुन्या इटरव्ह्यूचा व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) वायरल झाला आहे. नीरज चोपडा यामध्ये अँकरला हिंदीत प्रश्न विचारण्यासाठी सांगत आहे, सोशल मीडियावर यूजर्स त्याचे यावरून कौतूक करत आहेत. नीरज चोपडाने (Neeraj Chopra) नुकतीच टोकियो ऑलम्पिकमध्ये (Tokyo Olympics,) 87.58 मीटर अंतरावर भालाफेक (Javelin throw) करून सुवर्णपदक (Gold Medal) जिंकण्याची कामगिरी केली आहे.

नीरज चोपडा (Neeraj Chopra) आणि काही भारतीय खेळाडू सोमवारी भारतात आल्यानंतर त्यांचे जबरदस्त स्वागत झाले. या दरम्यान त्याचा एक जुना व्हिडिओ इंटरनेटवर वायरल झाला आहे.

हा व्हिडिओ 2019 चा आहे. इंडियन स्पोर्ट हॉनर अवॉर्ड सोहळ्यात (Indian Sport Honor Awards Ceremony) प्रसिद्ध कॉमेंटेटर जतिन सप्रू (Commentator Jatin Sapru)  कार्यक्रमाचे अँकरिंग करत होते. या कार्यक्रमात जतिन बोलत-बोलत नीरज चोपडाच्या जवळ पोहचले. यावेळी पहिल्यांदा जतिन हिंदीत बोलतात आणि नंतर इंग्रजीत नीरज चोपडाला प्रश्न विचारतात.

 

नीरज म्हणाला..हिंदी में पूछ लो जी (hindi mein poocho ji)

यावेळी नीरज चोपडा अत्यंत सौम्यपणे अँकरला म्हणतो की, हिंदी में पूछ लो जी. नंतर जतिन हिंदीत प्रश्न विचारतात आणि नीरज सुद्धा त्याची उत्तरे देतो. हाच व्हिडिओ पुन्हा एकदा सोशल मीडियावर वायरल झाला आहे. व्हिडिओ पाहून अनेक लोक नीरजचे कौतूक करत आहेत.

भाजपा नेता तजिंदर पाल सिंह बग्गा यांनी हा व्हिडिओ शेयर करत लिहिले आहे, देसी छोरा नीरज चोपडाचा जुना इंटरव्ह्यू.

 

याच व्हिडिओवर गणेश राव नावाच्या यूजरने लिहिले की, काय उत्तर आहे.
तो हिंदीत बोलायला घाबरला नाही आणि आपले मत मांडायला ही तो घाबरला नाही.
मी कोणत्याही फिल्मी हिरोला फॉलो करत नाही, तो आपल्या तरूणांचा हिरो असायला हवा.

तर आणखी एका यूजरने लिहिले आहे की, कोणतीही लाज वाटण्याचे कारण नाही.
सर्वांनी हिंदीत बोलायला पाहिजे. आपण दुसर्‍या भाषांना का प्रमोट करतो.

Web Title : neeraj chopra when tells anchor bhai hindi mein pooch lo video goes viral 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Police Recruitment – 2019 | पोलीस भरती 2019 साठी अर्ज केलेल्या उमेदवारांना माहिती अपडेट करण्यासाठी मुदत वाढ

Weather Update | आगामी 5 दिवसांत कोकणसह मध्य महाराष्ट्रात पुन्हा पावसाची शक्यता

Modi Government | मोदी सरकारच्या योजनेत दरमहिना एक रुपया खर्च करून मिळवू शकता 2 लाख रुपयांचा फायदा; जाणून घ्या