Neeraj Suryakant and Tejaswini Shirke | राष्ट्रीय सायकलपटू नीरज सूर्यकांतचं ‘तिरसाट’मधून अभिनयात पदार्पण ! ‘तिरसाट” २० मे पासून संपूर्ण महाराष्ट्रात; ‘नीरज सूर्यकांत आणि तेजस्विनी शिर्के ही फ्रेश जोडी प्रेक्षकांच्या भेटीला

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Neeraj Suryakant and Tejaswini Shirke | राज्य शासनाचा शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार मिळालेले सूर्यकांत पवार यांचा मुलगा आणि राष्ट्रीय सायकलपटू नीरज सूर्यकांत अभिनयात पदार्पण करत आहे. २० मे रोजी प्रदर्शित होणाऱ्या “तिरसाट” या चित्रपटात (Tirsat movie) नीरज प्रमुख भूमिकेत असून, या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच लाँच करण्यात आला. ( Neeraj Suryakant and Tejaswini Shirke)

 

दिनेश किरवे यांच्या क्लास वन फिल्मसने “तिरसाट” या चित्रपटाची निर्मिती केली आहे. अ‍ॅड. उमेश शेडगे सहनिर्माते आहेत. निर्माता दिनेश किरवे यांनीच चित्रपटाचं लेखन केलं आहे. तर प्रदीप टोणगे आणि मंगेश शेंडगे यांनी दिग्दर्शनाची जबाबदारी निभावली आहे. पी. शंकरन यांनी चित्रपटाचं संगीत दिग्दर्शन केलं आहे. नीरज सूर्यकांत आणि तेजस्विनी शिर्के ही नवी जोडी या चित्रपटातून पदार्पण करत आहे. प्रेम मिळवण्यासाठी सहन करावा लागणारा विरोध, प्रेमासाठी करावी लागणारी धडपड “तिरसाट” या चित्रपटात उलगण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वीच चित्रपटातलं “उधाण आलंया, फ़र्मान आलंया, जीवाला या जीवाचं आवताण आलंया,’ असे शब्द असलेलं गाणं आणि टीजर लाँच करण्यात आलं होता. या गाण्याला आणि टीजरला जोरदार प्रतिसाद मिळाला आहे. आता ट्रेलर प्रदर्शित करण्यात आल्यानं चित्रपटाची उत्सुकता आणखी वाढली आहे.
या चित्रपटात यतीन कार्येकर, ओंकार यादव, पल्लवी घुले, सुजीत चौरे, विवेक यादव, आनंद साने, रामदेव जमदाडे, नीलिमा कामने, श्रुती उबाळे यांच्यादेखील महत्वपूर्ण भूमिका आहेत. मुराद तांबोळी, मनिषा भोसले, निलेश कटके यांनी लिहिलेल्या गीतांना पी.शंकर यांनी संगीतबद्ध केले असून चित्रपटातील गाणी सुप्रसिद्ध गायक आदर्श शिंदे, गायिका मुग्धा कऱ्हाडे आणि पी. शंकर यांच्या सुमधुर आवाजात स्वरबद्ध करण्यात आली आहेत. (Neeraj Suryakant and Tejaswini Shirke)

 

वडिलांकडून मिळालेला खेळाचा वारसा पुढे चालवत नीरजनं सायकलिंग या खेळात नैपुण्य मिळवलं. जिल्हास्तरापासून सुरुवात करत राष्ट्रीय पातळीपर्यंत मजल मारली. मात्र खासगी कारणास्तव सायकलिंग बाजूला पडलं. एका चित्रपटाच्या निमित्ताने राज डावखरे, जय सुरवसे आणि सुरज टक्के या मित्रांमुळे नीरजची भेट दिग्दर्शक प्रदीप टोणगे आणि मंगेश शेंडगे यांच्याशी झाली. त्यानंतर नाटक आणि एकूणच मनोरंजन क्षेत्रातला नीरजचा प्रवास सुरू झाला. वऱ्हाड आलंय लंडनहूनसारखं नाटक, चांडाळचौकडीसारखा वेब सीरिज आणि शॉर्टफिम्स करत आता नीरज “तिरसाट” या चित्रपटातून पदार्पण करत आहे.

 

 

Web Title : – Neeraj Suryakant and Tejaswini Shirke | National cyclist Neeraj Suryakant’s acting debut in ‘Tirsat’! ‘Tirsat’ all over Maharashtra from May 20; ‘Neeraj Suryakant and Tejaswini Shirke meet fresh audience

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Pune NCP | शरद पवारांबाबत आक्षेपार्ह Facebook पोस्ट; अभिनेत्री केतकी चितळेवर कारवाई करा – पुणे राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसची मागणी

Ban on Wheat Exports | मोदी सरकारचा मोठा निर्णय ! गव्हाच्या निर्यातीवर तत्काळ बंदी

Baramati To Jejuri Journey | बारामती-जेजुरी प्रवास 35 मिनिटांत होणार