३० किलो स्फोटके वापरुन नीरव मोदीचा बंगला करणार ‘जमीनदोस्त’

अलिबाग : पोलीसनामा ऑनलाइन – अलिबागच्या समुद्र किनारी बेकायदेशीरपणे बांधण्यात आलेला फरार हिरे व्यापारी नीरव मोदी यांचा बंगला शुक्रवारी प्रशासनाकडून पाडण्यात येणार असून त्याची तयारी पूर्ण झाली आहे. हा बंगला ३० किलोची स्फोटके असलेले ११० डायनामाईटस लावून उध्वस्त करण्यात येणार आहे. त्यादृष्टीने आवश्यक ती सर्वसामुग्री बंगल्याच्या ठिकाणी आणण्यात आली आहे.

नीरव मोदी पंजाब नॅशनल बँकेची फसवणूक करुन देशाबाहेर पळून गेल्यानंतर त्याच्या सर्व मालमत्तेवर शासनाकडून टाच आणण्यात आली. त्यात अलिबागला त्याने बांधलेला बंगला हा बेकायदेशीर असल्याचे आढळून आले. त्यामुळे शासनाने हे बेकायदेशीर बांधकाम मुळापासून उध्वस्त करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यादृष्टीने बुधवारपासून या बंगल्याच्या भिंती जेसीबी लावून पाडण्यात आल्या. आता सिमेंट कॉक्रिटचा सांगाडा शिल्लक असून तो आज स्फोटके वापरुन पाडण्यात येणार आहे.

या बांधकामाच्या पाडकामावर लक्ष ठेवण्यासाठी अतिरिक्त जिल्हाधिकारी भरत शितोळे या ठिकाणी उपस्थित आहेत. सध्या या बंगल्याच्या सांगाड्याला स्फोटके लावण्याचे काम सुरु झाले असून त्यासाठी त्यातील माहितीगार अधिकारी हे काम करीत आहेत.

बंगला पाडण्यासाठी जो स्फोट करण्यात येणार आहे. त्याची तीव्रता २०० मीटर परिसरात जाणवणार आहे. त्यामुळे बंगल्याच्या आजू बाजूच्या घरातील लोकांना काही काळासाठी सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. येथील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे.

हा बंगला पाडण्याचे चित्रिकरण करण्यासाठी थेट मुंबईहून अनेक टिव्ही चॅनेलच्या कॅमेरे व वार्ताहरांनी येथे मोठी गर्दी केली आहे. काही जण या कामाचे थेट प्रक्षेपण करण्याच्या तयारीत आहेत.

ह्याही बातम्या वाचा –

डॉक्टर प्रेयसीचा लग्नास नकार ; टेक्निशियन युवकाची आत्महत्या

टँकरच्या धडकेत दुचाकीस्वार ठार 

#WomensDay : महिलादिनानिमित्त गुगलकडून ‘ती’चा खास सन्मान 

शिक्षिकेने ‘त्या’ गटशिक्षणाधिकाऱ्याल्या कार्यालयातच धोपटले

You might also like