मोदीचा बंगला होणार धडाम्म …!

अलिबाग : पोलीसनामा ऑनलाईन – घोटाळेबाज हिऱ्यांचा व्यापारी निरव मोदी याच्या तब्बल १०० कोटींच्या बंगल्यात अनेक मौल्यावान अँटिक आणि निजामकाळातील लिलावातील महागड्या वस्तू सापडल्या होत्या. अलिबाग मधील बंगल्यात सापडलेल्या या वस्तूंचा सर्वप्रथम लिलाव करण्यात येणार आहे. त्यानंतर त्याचा हा बंगला स्फोटकांच्या साहाय्याने उडवण्यात येणार आहे. अशी माहिती रायगडचे जिल्हाधिकारी विजय सूर्यवंशी यांनी दिली आहे.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, पंजाब नॅशनल बँकेला कोट्यावधी रुपयांचा चुना लावून हिरेव्यापारी निरव मोदी फरार आहे. सीबीआय आणि ईडी यांनी कारवाईचा बडगा उगारत मोदींच्या मालमत्तेवर धाड टाकण्यास सुरुवात केली आहे. न्यायालयाच्या निर्देशानुसार बंगला जमीनदोस्त करण्यात येणार आहे. परंतु बंगल्यामध्ये झुंबरे, टाईल्स, विजेचे किमती सामान, बुद्धांची मूर्ती यांसह अन्य किंमती वस्तू आहेत. प्रथम त्यांचा लिलाव करण्यात येणार आहे. नंतर स्फोटकांच्या साह्याने बंगला जमीनदोस्त करण्यात येणार आहे. जेसीबीच्या सहाय्याने शक्य तेवढे बांधकाम पाडण्यात येत आहे. परंतु बंगल्याचे बांधकाम मजबूत असल्याने जमीनदोस्त करण्यासाठी ब्लास्टिंग करावे लागणार असल्याचे जिल्हाधिकारी सूर्यवंशी म्हणाले.

मोदीच्या बंगल्यात सापडला खजिना

ईडी ने केलेल्या कारवाईदरम्यान प्रसिद्ध चित्रकारांच्या १२५ हुन अधिक पेंटिंग्स जप्त केली आहेत. तसेच हैद्राबादच्या निजामाशी संबंधित अंदाजे १०० वर्षापूर्वीचे जुने पडदे आणि हॉंगकॉंगमध्ये लिलावात २० लाखांना विकत घेतलेली लाकडी कारचे मॉडेल सुद्धा आढळून आले आहे. अधिकाऱ्यांना नीरव मोदींच्या बंगल्यात दुर्मिळ वस्तूंचा खजिना सापडला आहे. एम. एफ. हुसैन, के. के. हेब्बर, एंजोली इला मेनन, विवान सुंदरम, राजा रवि वर्मा या प्रसिद्ध चित्रकारांसह अन्य महागडी आणि दुर्मिळ पेंटिंग्ज कारवाईदरम्यान जप्त करण्यात आली आहेत.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like