NEET Exam 2022 | ‘नीट’ परीक्षा 17 जुलैला होणार; प्रवेशपत्र जारी, जाणून घ्या

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – NEET Exam 2022 | वैद्यकीय प्रवेशांसाठी राष्ट्रीय स्तरावरून घेण्यात येणाऱ्या राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा (नीट) (NEET Exam 2022) 17 जुलै रोजी होणार आहे. या परिक्षेसाठी प्रवेशपत्र मंगळवारी जारी करण्यात आले आहे. अर्ज क्रमांक व जन्मतारीख सबमिट करून प्रवेशपत्र डाऊनलोड करता येणार आहे. याबाबत माहिती राष्ट्रीय चाचणी एजन्सीने (NTA) दिली आहे.
नीट परीक्षा देशातील 497 शहरांमध्ये रविवारी (17 जुलै) रोजी दुपारी 2 ते सायंकाळी 5.20 या वेळेत होईल. प्रवेशपत्र दाखवल्याशिवाय विद्यार्थ्यांना केंद्रावर प्रवेश दिला जाणार नसल्याचं एनटीएकडून सांगण्यात आले आहे. तसेच, नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या ehttps://neet.nta.nic.in/ या वेबसाइटद्वारे विद्यार्थ्यांना प्रवेशपत्र मिळू शकणार आहेत.
एनटीएच्या माहितीनुसार, प्रवेशपत्रासंदर्भात कोणतीही अडचण आल्यास विद्यार्थ्यांनी 011-40759000 या क्रमांकावर किंवा [email protected]. या ई-मेल आयडीवर संपर्क साधावा. या दोन्ही माध्यमांद्वारे विद्यार्थ्यांच्या तक्रारी सोडवण्यात येतील.
नियमावली काय आहे ?
– पावसाची परिस्थिती लक्षात घेता विद्यार्थ्यांनी परीक्षेच्या दिवशी वेळेआधीच केंद्रांवर उपस्थित राहणे आवश्यक.
– ‘नीट’ परीक्षा ज्या शहरांत होणार आहे, त्या शहरांमधील केंद्रांची यादी यापूर्वीच प्रसिद्ध करण्यात आली आहे.
– काही विद्यार्थ्यांनी एनटीएकडे परीक्षा केंद्र आणि शहर बदलण्याची विनंती केली होती. त्यांच्या विनंतीनुसार त्यांचे केंद्र बदलण्यात आले आहे.
– आता कोणत्याही परिस्थितीत विद्यार्थ्यांचे परीक्षा केंद्र बदलले जाणार नाहीत.
Web Title :- NEET Exam 2022 | neet exam 2022 neat exam on july 17
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update