नीट परीक्षेदरम्यान नियम न पाळणारयांवर कारवाई

पुणे : पोलिसनामा ऑनलाईन

‘नीट’ परीक्षेसंदर्भात नियम न पाळणाऱ्या विद्यार्थ्यांना चांगलेच परिणाम भोगावे लागले. ड्रेस कोड सहित वेळेच्या बाबतीत देखील नीट कडून कडक नियमावली करण्यात आली होती. याचा फटका काही विद्यार्थ्याना बसल्याचे दिसत आहे.

विद्यार्थ्यांनी कॉलर, खिसे असलेले शर्ट घालून येऊ नयेत असे आधीच सांगितले असताना सुद्धा ऐन वेळी या नियमाचे पालन न करणाऱ्या विद्यार्थ्यांवर कारवाई करण्यात आली. कॉलर असलेल्या विद्यार्थ्याचे शर्ट कॉलर आणि खिसे चक्क कात्रीने कापण्यात आले.औंध येथील केंद्रावर विद्यार्थी बटण असलेला शर्ट घालून आला होता त्याला तर बनियवर परीक्षेला बसवण्यात आले. त्यामुळे हे विद्यार्थी कोणत्या मानसिकतेतून परीक्षेला गेले असतील याचा विचार न केलेलाच बरा.

केंद्रीय माध्यमिक मंडळाने अतिशय कडक नियमावली केली होती. ड्रेस कोड सहीत केंद्रात पेन,घड्याळ पाण्याची बाटली तसेच इतर साहित्य घेऊन जाण्यास मनाई करण्यात आली होती. वेळेच्या बाबतीत देखील काटेकोरपणा पाळला गेला. सोलापूर येथून पुण्यातील परीक्षा केंद्रावर यायला एका विद्यार्थ्याला तीन मिनिटे उशीर झाला त्यामुळे त्याला परीक्षेस येऊ दिले नाही. परीक्षेची वेळ सकाळी दहाची असली तरी विद्यार्थ्याना सकाळी ७.३० ते ८.३० आणि ८.३० ते ९. ३० असे दोन गटात विभागून वेळेआधी येण्यास सांगितले होते. तसे प्रवेश पत्रावर नमूद देखील करण्यात आले होते.