ताज्या बातम्यामहत्वाच्या बातम्या

NEET परीक्षेत शोएब आणि आकांक्षाला सारखेच ‘मार्क’, मग आकांक्षाचाच दुसरा नंबर का ?

मुंबईः पोलीसनामा ऑनलाईन – नीट परीक्षेत ओडिशाचा शोएब अफताब आणि दिल्लीच्या आकांक्षा सिंह या दोघांनी 720 गुण मिळवून देशात प्रथम क्रमांक पटकावला. मात्र शोहब अफताब यांनी प्रथम क्रमांक पटकावला म्हणून नोंद झाली. तर शोएब एवढेच गुण मिळवलेल्या आकांक्षाला दुसरा क्रमांक मिळाला आहे. आकांक्षा आणि शोएब या दोघांनी नीट परीक्षेत सारखेच गुण मिळवलेत. मग आकांक्षाचा दुसरा क्रमांक कसा ठरवला गेला असा प्रश्न सर्वांचा पडला आहे. याची सध्या सोशल मिडियावर चर्चा रंगली आहे. विषेश म्हणजे आकांक्षाचे फेक अकाऊंट तयार करून त्यातूनही हाच प्रश्न विचारला आहे. मात्र नॅशनल टेस्टींग एजन्सी, टाई ब्रेकींगनुसार, कमी वयाच्या विद्यार्थ्यास दुसरा क्रमांक दिला जातो.त्यामुळे आकांक्षाचा पहिला नंबर हुकला.शोएब हा आकांक्षापेक्षा वयाने मोठा आहे.

वैद्यकीय परीक्षेसाठी घेतलेल्या नीट परीक्षेचा निकाल शुक्रवारी जाहीर झाला. देशात 13 सप्टेंबर व 14 ऑक्टोंबर रोजी नीटची परीक्षा घेण्यात आली. देशातून 15 लाख 97 हजार 435 विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. परीक्षेचा निकाल 16 ऑक्टोंबरला जाहीर झाला. पण दिवसबर एनटीएचे सर्व्हर डाऊन असल्याने विद्यार्थ्यांचा निकाल हाती यायला उशीर लागला. त्यामुळे विद्यार्थ्यांचा हिरमोड झाला.यात शोहब अफताब यांनी 720 गुण मिळत प्रथम क्रमांक पटकावला म्हणून नोंद झाली. तर शोएब एवढेच गुण मिळवलेल्या आकांक्षाला दुसरा क्रमांक मिळाला आहे.

आकांक्षाच्या उत्तर प्रदेशातील घरी सध्या आनंदाचे वातावरण आहे. अभिनंदन करण्यासाठी घरी लोकांची गर्दी वाढली आहे. आपल्याला 700 पेक्षा जास्त गुण मिळतील पण प्रथम किंवा व्दितीय क्रमांक येईल, असे वाटले नव्हते, असे आकांक्षाने म्हटले आहे. तिला न्युरो सर्जन व्हायचे असून त्याच क्षेत्रात करीअर करायचे आहे. त्यामुळे प्रथम किंवा व्दितीय क्रमांकाबद्दल आपल्याला काहीच वाटत नाही. कारण एम्समध्ये आपल्याला प्रवेश मिळेल, याचा आनंद असल्याचे ती म्हणाली.

महाराष्ट्रातील 4 जण टॉप 50 मध्ये
राज्यातील आशिष झान्टये याने 710 गुण मिळवून राज्यात अव्वल स्थान मिळवले आहे. तर तेजोमय नरेंद्र वैद्य, पार्थ संजय कदम व अभय अशोक चिल्लरगे यानी 705 गुण मिळवून राज्यात व्दितीय क्रमांक पटकावला आहे. देशातील सर्वाधिक गुण मिळवणा-या 50 विद्यार्थ्यांमद्ये उपरोक्त विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

Back to top button