26 जुलैला NEET आणि 18-23 जुलैला होणार JEE Mains ची परीक्षा !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना संकटामुळे आता National Eligibility Cum Entrance Test (NEET) ची परीक्षा २६ जुलैला होणार आहे. सोबतच Joint Entrance Examination (JEE) Mains ची परीक्षा १८ जुलै ते २३ जुलै दरम्यान होणार आहे आणि JEE Advance ची परीक्षा आता ऑगस्टमध्ये होणार आहे. ही घोषणा मानव संसाधन विकास मंत्री रमेश पोखरीयाल निशंक यांनी मंगळवारी केली.

जे उमेदवार या तारखेची आतुरतेने वाट पाहत आहेत, त्यांची अडचण लक्षात घेता केंद्रीय मानव संसाधन विकास मंत्री डॉ. रमेश पोखरीयाल निशंक लाइव्ह चॅटद्वारे उमेदवारांच्या प्रश्नांची उत्तरे दिली. खाली दिलेल्या लिंकद्वारे ऐका ते काय म्हणाले.

डॉ. रमेश पोखरीयाल निशंक यांनी विद्यार्थ्यांसोबत वेबिनार घेतला. त्यांना ट्विटरवर #EducationMinisterGoesLive हॅशटॅगसह देशभरातील बऱ्याच विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारले. ते म्हणाले की ही अशी वेळ आहे ज्याबाबत संपूर्ण जगाने विचारही केला नव्हता की या परिस्थितीतून जावे लागेल. त्यांनी भारत सरकारच्या घेतलेल्या निर्णयाचे कौतुक केले. यानंतर त्यांनी मेडिकल इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेशासाठी नीट परीक्षा आणि अभियांत्रिकीमध्ये प्रवेशासाठी जेईई मेन्स परीक्षेच्या तारखांची घोषणा केली.

मेडिकल आणि इंजिनिअरिंगच्या यूजी कोर्सेसमध्ये प्रवेश घेण्यासाठी दरवर्षी लाखो विद्यार्थी नीट आणि जेईई मेन सारख्या परीक्षेत सामील होत असतात. यावर्षीदेखील लाखो विद्यार्थी या परीक्षांची वाट पाहत आहेत. आता नवीन तारखा जाहीर झाल्यानंतर ते याची तयारी करू शकतात.

यावेळी कोरोनामुळे बदललेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय परीक्षा एजन्सीने (एनटीए) नीट यूजी २०२० आणि जेईई मेन २ मध्ये थोडी शिथिलता दिली होती. सर्व परीक्षार्थींना या परीक्षांसाठी अगोदर भरलेल्या परीक्षा शहराचा पर्याय बदलण्याची संधी दिली होती.