NEET Result 2020 : नीटचा निकाल जाहीर, ओडिशाचा शोएब देशात पहिला, तर महाराष्ट्रात आशिष अव्वल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – शुक्रवारी रात्री उशिरा वैद्यकीय प्रवेशाच्या नीट परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून या परीक्षेत ओडिशाचा शोएब आफताब व दिल्लीच्या आकांक्षा सिंग यांनी 720 गुण मिळवून देशात प्रथम क्रमांक मिळविला. तर महाराष्ट्रातील आशिष अविनाश झान्ट्यूे याने 710 गुण मिळवून राज्यात अव्वल स्थान मिळविले.

राज्यात तेजोमय नरेंद्र वैद्य, पार्थ संजय कदम व अभय अशोक चिल्लरगे या तिघांनी 705 गुण मिळवून द्वितीय क्रमांक मिळविला. देशातील सर्वाधिक गुण मिळालेल्या 50 विद्यार्थ्यांमध्ये वरील चौघेजण आहेत.

वैद्यकीय प्रवेशासाठी असणारी नीट परीक्षा 13 सप्टेंबर व 14 ऑक्टोबर रोजी घेण्यात आली होती. ही परीक्षा देशभरातून सुमारे 15 लाख 97 हजार 435 विद्यार्थ्यांनी दिली होती. दिवसभर एनटीएचे सर्व्हर डाऊन असल्याने विद्यार्थ्यांचा हिरमोड झाला होता. अखेर रात्री उशीरा निकाल समजला.