NEET UG Result 2021 | एनटीएने मेडिकल प्रवेश परीक्षा NEET चा निकाल केला जाहीर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – NEET UG Result 2021 | राष्ट्रीय चाचणी एजन्सी म्हणजे एनटीएने नीट यूजी 2021 चा निकाल जाहीर केला आहे. निकाल रात्री आठ वाजल्यानंतर एनटीएच्या वेबसाइटवर सुद्धा उपलब्ध झाला आहे. उत्तर प्रदेश आग्रा येतील निखर बन्सल यास ऑल इंडिया पाचवी रँक मिळाली. निखरने 99.99 पर्सेन्टाइलसह 720 मध्ये 715 गुण मिळवले आहेत. (NEET UG Result 2021)

 

निखर बन्सलशिवाय इतर टॉपर्सची माहिती लवकरच मिळणार आहे. एनटीएने पदवी वैद्यकीय आभ्यासक्रमासाठी प्रवेश परीक्षा राष्ट्रीय पात्रता सह प्रवेश परीक्षा (नीट) 2021 चा निकाल ईमेलच्या माध्यमातून वितरित करण्यास सुरूवात केली आहे.

 

सर्वोच्च न्यायालयाने दोन उमेदवारांसाठी नव्याने परीक्षेचा आदेश देणार्‍या मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती दिल्यानंतर एनटीएने निकाल जाहीर केले आहेत. प्रवेश परीक्षा सप्टेंबरमध्ये देश आणि परदेशातील परीक्षा केंद्रांवर आयोजित करण्यात आली होती. या वर्षी जवळपास 16 लाख उमेदवारांना परीक्षा दिली होती. हे निकाल एनटीएची अधिकृत वेबसाइट neet.nta.nic.in वर अपलोड केले आहेत.

 

एनटीएकडून मेडिकल प्रवेश परीक्षा अगोदर 01 ऑगस्टला होणार होती,
परंतु कोरोनामुळे ती पुढे ढकलण्यात आली आणि नंतर 12 सप्टेंबर 2021 ला नीट परीक्षा आयोजित करण्यात आली होती. परीक्षा पेन अँड पेपर मोड म्हणजे लेक्षी माध्यमातून झाली होती. निकालाची घोषणा करण्यापूर्वी, एनटीएने उमेदवारांच्या नोंदलेल्या प्रतिक्रिया, ओएमआर शीट आणि अंतरिम अ‍ॅन्सर की जारी केली होती.

 

Web Title :- NEET UG Result 2021 | neet ug scorecard nta announces medical entrance exam neet ug result 2021

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime | गुंतवणूकदारांची कोट्यवधींची फसवणूक ! परदेशी निघालेल्या एम. जी. एंटरप्राइजेसच्या अलनेश सोमजी, पत्नी डिंपल सोमजीला दिल्ली एअरपोर्टवर पकडलं; दाम्पत्यास ताब्यात घेऊन गुन्हे शाखेच्या पथकाचे पुण्याकडे ‘प्रयाण’

T20 WC | पराभवानंतर विराट कोहलीच्या कुटुंबाला मिळतेय धमकी? ‘या’ पाकिस्तानी दिग्गजाने व्यक्त केली नाराजी

Coronavirus in Maharashtra | मोठा दिलासा! राज्यात ‘कोरोना’ रुग्णांची संख्या हजाराच्या आत, गेल्या 24 तासात 1901 रुग्णांना डिस्चार्ज, जाणून घ्या इतर आकडेवारी