home page top 1

नीती आयोगाच्या बैठकीत ठरला ‘महासत्‍ता’ बनण्याचा ‘दिशादर्शक नकाशा’, २०२४ पर्यंत ५ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचं ‘टार्गेट’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – नीती आयोगाच्या महत्वपुर्ण बैठकीत अनेक विषयांवर चर्चा झाली. यातच देशाची अर्थव्यवस्था २०२४ पर्यंत ५००० अरब डॉलर पर्यत नेण्याचे लक्ष असणार आहे. राष्ट्रपती भवनात झालेल्या या नीती आयोगाच्या बैठकीत मोदींनी संबोधित करताना सांगितले की २०२४ पर्यंत देशाला ५००० अरब डॉलरची अर्थव्यवस्था बनवणे एक मोठे आव्हान आहे. परंतू यात राज्यांनी मिळून प्रयत्न करायला हवेत. त्यांनी सांगितले की, त्यांनी राज्यांना निर्यात वाढवण्यावर लक्ष देण्यास सांगितले आहे. कारण लोकांचा रोजगार आणि उत्पन्न वाढवण्यासाठी निर्यात क्षेत्र अत्यंत महत्वपूर्ण आहे.

मोदींना दिला सबका साथचा मंत्र –

पंतप्रधान मोदींनी सांगितले की नव्याने बनवण्यात आलेले जल शक्ती मंत्रालय पाण्याच्या नियोजनाबाबत एक समन्वय दृष्टिकोन आणण्यासाठी मदत करणार आहे. राज्यांना देखील जल संरक्षण आणि नियोजन याबाबत विविध प्रयत्न करण्यात यावे. मोदी असे देखील म्हणाले की सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास हा मंत्र पूर्ण करण्यासाठी नीती आयोग अत्यंत महत्वपूर्ण आहे.

ममता बॅनर्जी आणि चंद्रशेखर राव यांची बैठकीला दांडी –

या बैठकीला पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी अनुपस्थिती लावली, यावर चर्चा सुरु होत्या की त्या बैठकीला उपस्थिती लावणार अथवा नाही. पण त्या सांगितल्या प्रमाणे बैठकीला आल्या नाहीत. तसेच तेलंगणाचे चंद्रशेखर राव यांनी देखील नीती आयोगाच्या बैठकीला अनुपस्थिती लावली. या दोन नेत्यांशिवाय इतर सर्व राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी नीती आयोगाच्या बैठकीला उपस्थिती लावली होती. केंद्र शासित प्रदेशातील सर्व राज्यपाल देखील यावेळी उपस्थित होते. तसेच भाजपचे वरिष्ठ नेते देखील या बैठकीला उपस्थित होते.

सिनेजगत

अभिनेत्री प्रियंका चोपडा सलमान खानच्या ‘भारत’ चित्रपटाबाबत मोठं वक्‍तव्य

‘या’ खास कारणामुळे ‘छपाक’मधील लक्ष्मीच्या रोलसाठी दीपिकाचीच निवड !

‘या’ 5 बॉलिवूडच्या ‘टॉप’ अभिनेत्रींनी मृत्यूनंतर मागे सोडली कोटयावधीची संपत्‍ती

BigBoss Marathi-2 : मी किशोरी नाही, तिच्या आणि माझ्या नावातला फरक समजतो का? : रेणुका शहाणे

 

 

Loading...
You might also like