वरुण धवन, कृती सेनन पाठोपाठ नीतू कपूरला ‘कोरोना’ची लागण !

पोलीसनामा ऑनलाइन – अलीकडेच बॉलिवूड स्टार वरुण धवन (Varun Dhawan), नीतू कपूर (Neetu Kapoor) आणि डायरेक्टर राज मेहता (Raj Mehta) तसेच मनीष पॉल (Manish Paul), कृती सेनन (Kriti Sanon) यांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं होतं. आता नीतू कपूर यांनी एक पोस्ट शेअर करत कोरोना झाल्याचं कंफर्म केलं आहे आणि चाहत्यांना याबाबत माहिती दिली आहे. सध्या त्या सेल्फ क्वारंटाईन असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.

नीतू यांनी त्यांच्या इंस्टावरून एक पोस्ट शेअर केली आहे. यात त्यांनी लिहिलं की, माझी कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आली आहे. त्यामुळं सेल्फ क्वारंटाईन झाले आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानं औषधं घेत असून स्वत:ची काळजी घेत आहे. माझ्याप्रति काळजी आणि एवढं प्रेम व्यक्त करण्यासाठी धन्यवाद. सर्वांनी स्वत:ची काळजी घ्या. मास्क वापरा. सुरक्षित अंतर राखा.

जुग जुग जियो (Jug Jug Jeeyo) सिनेमाच्या शुटींगवेळीच नीतू यांना कोरोनाची लागण झाली आहे. या सिनेमाच्या निमित्तानं नीतू बऱ्याच वर्षांनंतर रुपेरी पडद्यावर झळकणार आहेत. या सिनेमात त्यांच्यासोबत वरुण धवन, कियारा आडवाणी, प्राजक्ता कोळी हे कलाकार देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.