Video : नीतू कपूरनं शेअर केला ‘कोरोना’ टेस्टचा व्हिडिओ ! नंतर करावा लागला Delete

पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड स्टार ऋषी कपूर (Rishi Kapoor) यांची पत्नी आणि दिग्गज अ‍ॅक्ट्रेस नीतू कपूर (Neetu Singh) नं धर्मा प्रॉडक्शनचा (Dharma Productions) आगामी सिनेमा जुग जुग जियो (Jug Jug Jiyo) ची शूटिंग सुरू केली आहे. अलीकडेच नीतू शूटिंगसाठी सेटवर आली होती. नीतूनं सेटवरून काही व्हिडिओदेखील शेअर केले होते. ज्यात ती कोरोना टेस्ट करताना दिसत होती. यात कोरोना टेस्ट (COVID 19) साठी तिच्या नाकातून आणि तोंडातून स्वॅब घेतले जाताना दिसत होते. नीतूचा हा व्हिडिओ सध्या सोशलवर प्रचंड व्हायरल होत आहे. यावर अनेकांनी कमेंट्सही केल्या आहेत. तिच्या कोरोना टेस्ट करण्यावर आता अनेक सवाल उपस्थित केले जात आहेत.

नीतूनं तिच्या इंस्टावरून हे टेस्टचे व्हिडिओ शेअर केले होते. यानंतर या पोस्ट्सवर जणू काही कमेंट्सचा पूरच आला होता. यानंतर नीतूनं व्हिडिओ डिलीट केला. अनेकांनी तिच्या कोरोना टेस्ट करण्याच्या पद्धतीवरून सवाल उपस्थित केले. चाहत्यांच्या मते टेस्ट करण्याची ही योग्य पद्धत नाही.

एकानं या टेस्टबद्दल आश्चर्य व्यक्त करत लिहिलं की, कोरोना टेस्ट करण्याची ही योग्य पद्धत नाही. स्वॅब नाकाच्या खूप आत जायला हवा आणि 30 सेकंद ते नाकात रोटेट करणं गरजेचं आहे. ही पद्धत चुकीची आहे आणि यामुळं टेस्ट रिपोर्ट निगेटिव्हच येणार.

You might also like