Neetu Singh Kapoor Viral Dance Video | वयाच्या 63 व्या वर्षी नितू कपूरनं दिली चक्क नोरा फतेहीला टक्कर, डान्स पाहून तुम्हीही होताल थक्क !

पोलीसनामा ऑनलाइन टीम – नीतू सिंग कपूरनं (Neetu Singh Kapoor Viral Dance Video) एकेकाळी पूर्ण बॉलीवूड हादरुण सोडलं होत. मात्र वयाच्या अवघ्या 63 व्या वर्षी नीतू सौंदर्यामध्ये अनेक दिग्गज अभिनेत्रींना टक्कर देते. सध्या त्या ‘डान्स दीवाने ज्युनियर्स (Dance Deewane Juniors)’ या रिएलिटी शो च्या परिक्षक आहेत. त्यांचा सोबतच या शो मध्ये नोरा फतेही (Nora Fatehi) आणि मर्झी पेस्टनजी (Marzi Pestonji) सुद्धा परिक्षक म्हणून दिसणार आहे. नुकतंच सोशल मीडियावर नीतू सिंग कपूरचा एक व्हिडिओ तुफान व्हायरल (Neetu Singh Kapoor Viral Dance Video) होताना दिसत आहे.

 

 

नीतू सिंग कपूरचा (Neetu Singh Kapoor) हा व्हिडिओ ‘डान्स दीवाने ज्युनियर्स’ या कार्यक्रमातील आहे. व्हिडिओमध्ये त्या डान्स करताना दिसत आहे. तसेच डान्स करत असताना, त्या नोराला डान्समध्ये जबरदस्त टक्कर देताना दिसत आहे (Neetu Singh Kapoor Viral Dance Video). हा व्हिडिओ नीतू सिंहने स्वत: आपल्या इंन्टाग्रामच्या अकाउंटवर शेअर केला आहे. व्हिडिओखाली त्यांनी लिहिलं की, ‘माझ्या आवडीच्या लोकांसह डान्स दीवाने ज्युनियर्सच्या मंचावर खूप मज्जा केली.’ व्हिडिओ शेअर केल्यानंतर अनेक कलाकारांनी यावर कमेंट्स करून त्यांचा डान्सचं तुफान कौतुक केलं आहे. तसेच अभिनेत्री नोरानं सुद्धा कमेंट करत म्हटलं की, ‘तुम्ही अमेझिंग आहात.’

 

व्हायरल झालेला हा व्हिडिओ पाहून अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) सुद्धा थक्क झाली. ती व्हिडिओवर (Neetu Kapoor Instagram Video) स्वत:ला कमेंट करण्यापासून रोखू शकली नाही. तिनं कमेंटमध्ये ‘सच अ स्टार’ असं लिहून त्यांच कौतुक केलं आहे. तसेच अनेक कलाकारांनी यावर हार्ट इमोजी, फायर इमोजी पोस्ट करून त्यांचावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

 

दरम्यान, ‘एज इस जस्ट नंबर (Age Is Just Number)’ या वाक्याला नीतू सिंह कपूरनं खरं केलं आहे.
तसेच लवकरच त्या ‘जुग जुग जियो’ या आगामी चित्रपटामध्ये दिसणार आहे.
त्यांच्या सोबत या चित्रपटामध्ये अनिल कपूर (Anil Kapoor), कियारा अडवाणी (Kiara Advani) आणि
वरुन धवन (Varun Dhawan) हे कलाकार मुख्य भूमिकेत असणार आहे.

 

 

Web Title :- Neetu Singh Kapoor Viral Dance Video | neetu kapoor dance on song dance meri rani gives tough competition to nora fatehi

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Jitendra Awhad Reaction On Raj Thackeray | जितेंद्र आव्हाडांचं राज ठाकरेंना खुलं आव्हान; म्हणाले – ‘मदरशात दाढीचा वस्तरा जरी सापडला तरी राजकारण सोडेन’

 

Kishori Pednekar On Raj Thackeray | महापौर किशोरी पेडणेकरांची राज ठाकरेंवर टीका; म्हणाल्या – ‘तुंबलेल्या मोरीतून भाजपचे गांडूळ…’ (व्हिडिओ)

 

Pune Crime | शेअर मार्केटमधून मुद्दलासह दीडपट रक्कम परत करण्याच्या अमिषाने सव्वा कोटींची फसवणूक, जितेंद्र मालखेडेवर FIR