खुशखबर ! 1 जानेवारीपासुन बँकेच्या खातेदारांना एकदम ‘फ्री’ मिळणार ‘ही’ सुविधा, RBI नं दिला आदेश

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सामान्य नागरिकांना मोठा दिलासा दिला आहे. आरबीआयने यासंबंधी घोषणा करताना बचत खात्यावरून जाणाऱ्या NEFT साठी शुल्क आकारले जाणार नाही. हा नवीन नियम 1 जानेवारी 2020 पासून लागू होणार असून पुढील नववर्षापासून तुम्ही मोफत NEFT करू शकणार आहात.

काय हे NEFT
नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रांसफर, म्हणजेच NEFT च्या माध्यमातून तुम्ही कुणालाही थेट पैसे पाठवू शकता. एका शाखेतून दुसऱ्या शाखेत किंवा एका बँकेतून दुसऱ्या बँकेत पैसे पाठ्वण्यासाठी या पद्धतीचा वापर करण्यात येतो. आजघडीला अनेकजण याचा फायदा घेत असून आतापर्यंत बँकेत या सेवेसाठी पैसे मोजावे लागत असत.

दरम्यान, याआधी रिझर्व्ह बँकेने आरटीजीएस या सेवेसाठी देखील शुल्क रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर आता NEFT वरील शुल्क देखील रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

Visit : Policenama.com