16 डिसेंबरपासून बदलणार बँक व्यवहारा संदर्भातील ‘हा’ नियम, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आरबीआयने डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रांसफरला (NEFT) 16 डिसेंबरपासून 24 तास सुरु ठेवण्याची घोषणा केली आहे. RBI ने सांगितले की NEFT अंतर्गंत ट्रांजेक्शनची सुविधा सुट्यांबरोबरच सातही दिवस उपलब्ध करुन देण्यात येईल.

NEFT ट्रांजेक्शनचा वापर सकाळी 8 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत तसेच पहिल्या आणि तिसऱ्या शनिवारी सकाळी 8 ते दुपारी 1 वाजेपर्यंत करता येत होता.

24 तास ट्रान्सफर करा पैसे –
आरबीआयने एका अधिसूचनेत म्हणले की NEFT ट्रांजेक्शनला 24 तास, सातही दिवस सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आरबीआने सर्व सदस्य बँकांच्या नियामकांकडे चालू खात्यात वेळेनुसार आवश्यक रक्कम ठेवण्यास सांगितले आहे जेणे करुन ट्रांजेक्शची समस्या येणार नाही.

आरबीआयने सांगितले की सर्व बँकांना सुरळीतपणे एनईएफटी ट्रांजेक्शन सुनिश्चित करण्यासाठी सर्व आवश्यक रचना दुरुस्त ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. ते म्हणाले की NEFT मध्ये करण्यात आलेल्या बदलांबाबत बँका उपभोक्त्यांना सूचना देऊ शकतात.

NEFT आणि RTGS ला शुल्क नाही –
आरबीआयने पहिल्यांदाच NEFT आणि RTGS साठी घेण्यात येणारे ट्रांजेक्शन शुक्ल बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

काय आहे NEFT –
नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर (NEFT) देशात बँकेच्या माध्यमातून ट्रान्सफर करणे म्हणजेच एका जागेवरुन दुसऱ्या जागी पाठवण्याची पद्धत. या पद्धतीचा फायदा सामान्य ग्राहक किंवा कंपनी घेऊन कोणत्याही दुसऱ्या शाखेत किंवा दुसऱ्या शहरातील शाखेत कोणत्याही व्यक्ती किंवा संघटनेला पाठवू शकतात. आज जवळपास सर्वच बँकांनी एनईएफटी तंत्रज्ञान स्वीकारले आहे. यामाध्यमातून फंड पाठवण्याची सर्व माहिती ग्राहकांना देण्यात येते.

Visit : Policenama.com

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like