RBI कडून सर्वसामान्यांसाठी मोठी घोषणा ! आता NEFT ची सुविधा 24 तास चालू राहणार, कधीही पाठवा पैसे, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – RBI ने डिजिटल ट्रांजेक्शनला प्रोस्ताहन देण्यासाठी मोठे आणि महत्वाचे पाऊल उचलले आहे. आरबीआयचे हे पाऊल सर्वांसाठीच खूपच लाभकारी ठरणारे आहे. आरबीआयने सांगितले की नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड्स ट्रान्सफरचा म्हणजेच NEFT चा 24 तास वापर करता येणार आहे.

एनईएफटी देशात बँकेच्या माध्यमातून फंड ट्रान्सफर करणे म्हणजेच एका ठिकाणाहून दुसरीकडे पाठवण्याची एक पद्धत आहे. या माध्यमातून तुम्ही 50 हजार रुपयांपर्यंतची रक्कम ट्रान्सफर करु शकतात. विशेष वेळी रक्कमेची ही मर्यादा बँक वाढवून देखील देते.

काय आहे NEFT सेवा, आतापर्यंत काय होते नियम –
ICICI बँकेच्या वेबसाइटवर देण्यात आलेल्या माहिती नुसार NEFT चा वापर कामकाजाच्या दिवसात म्हणजे बँकेच्या वेळेत करता येत होता. म्हणजेच सोमवार ते शनिवार या सेवाचा लाभ घेता येत होता. परंतू दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी बँकेला सुट्टी असल्याने या सेवेचा लाभ घेता येत नव्हता. यासाठी वेळ निश्चित करण्यात आली होती, ही सेवा बँकेच्या कामकाजाच्या वेळेत सकाळी 8 ते संध्याकाळी 6.30 वाजेपर्यंत उपलब्ध करुन देण्यात येत होती. मात्र आता ही सेवा 24 तास ग्राहकांना उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

– आरबीआय गव्हर्नर शशिकांत दास यांनी सांगितले की NEFT चा वापर आता बँकेच्या कामकाजाच्या वेळेत 24 तास करता येणार आहे.

– आरबीआयने नुकतेच RTGS आणि NEFT च्या माध्यमातून फंड ट्रान्सफरवरील शुल्क रद्द केले आहे. डिजिटल ट्रांजेक्शनला प्रोस्ताहन देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला. बँकांना सांगण्यात आले आहे की याचा फायदा ग्राहकांना देण्यात यावा.

– आरबीआयच्या मते या वर्षी एप्रिल महिन्यात एनईएफटीच्या माध्यमातून 20.34 कोटी ट्रांजेक्शन झाले. या दरम्यान आरटीजीएसच्या माध्यमातून 1.14 कोटी रुपयांचे व्यवहार झाले.

visit : Policenama.com