Neha Dhupia : अभिनेत्री नेहा धुपिया गुपचूप विवाहबंधनात

नवी दिल्ली :वृत्तसंस्था
बॉलीवूड अभिनेत्री नेहा धुपिया तिच्याखास मित्र अंगद बेदीसोबत नुकतीच विवाह बंधनात अडकली. नेहानी आजच तिच्या सोशल मीडियावर लग्नाचा एक फोटो शेअर केला आहे. या दोघांचा विवाह दक्षिण दिल्लीतील गुरुद्वारामध्ये, काही खास मंडळी आणि नातेवाईकांच्या उपस्थितीत पार पडला.

नेहाने आपल्या ट्विटर,इंस्टाग्राम खात्यावर हे जाहीर केले. “हे लग्न म्हणजे माझ्या आयुष्यातला सर्वात चांगला निर्णय आहे. मी माझ्या खास मित्राबरोबर विवाहबद्ध झाले आहे.” तर अंगद बेदीने देखील आपल्या ट्विटर खात्यावर “खास मैत्रीण आता पत्नी झाली” अशा स्वरूपाचे ट्विट केले आहे.

या विवाहा प्रसंगी अंगदने शेरवानी तर नेहाने सुंदर बेबे पिंक रंगाचा लेहंगा परिधान केला होता. सोनमच्या लग्नानंतर आता नेहा आणि अंगद यांनी केलेल्या गुपचुप विवाहाची छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

अंगद हा माजी क्रिकेटपटू बिशनसिंग बेदी यांचा मुलगा आहे. त्यामुळे या विवाह समारंभाला अजय जडेजा, आशीष नेहरा आणि गौरव कपूर तसेच इतर क्रिकेट विश्वातील मंडळींनी देखील हजेरी लावली होती. नेहा आणि अंगदला अगदी साध्या पद्धतीने विवाह करायचा होता त्यामुळे त्यांनी कोणताही गाजावाजा न करता लग्न केले.