home page top 1

अभिनेत्री नेहा धूपियानं ऑस्ट्रियात घेतली सुट्यांची ‘मजा’, केले ‘हॉट’ फोटो शेअर (व्हिडीओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड अभिनेत्री नेहा धूपिया सध्या आपल्या सूट्या ऑस्ट्रियामध्ये एँजॉय करत आहे. ही सुंदर अभिनेत्री अल्ताउसी लेक येथे आपल्या सुट्याची मजा घेत आहे.

अल्ताउसीच्या निळ्याशार लेक वर तिचे सौंदर्य उठून दिसत आहे. निवांत आणि आरामशीर असा दिवस ती घालवत आहे. ऑस्ट्रियाच्या अल्ताउसी लेकच्या निसर्ग रम्य वातावरणात ती आराम करत आहे.

View this post on Instagram

☀️ #vivamayr #altaussee

A post shared by Neha Dhupia (@nehadhupia) on

तेथील तिचे फोटो सोशल मिडियावर शेअर करत तिने कॅप्शन दिला आहे की आता मला थेट पुढच्या सोमवारी उठवा. या फोटोत ती लेकच्या कडेला आराम करताना दिसत आहे. तिच्या या फोटोवर तिच्या चाहत्यांनी विविध कमेंट केल्या आहेत.

नेहाने मागीलवर्षी तुम्हारी सुलु या सिनेमात देखील काम केले होते. तिचा अभिनय प्रेक्षकांना आवडला होता. त्यासाठी तिला बेस्ट सपोर्टिंग एक्ट्रेसचा अवॉर्ड देखील देण्यात आला आहे. नेहाने आपला बायफ्रेंड अंगद बेदी बरोबर 10 मे 2018 ला अचानक विवाह करुन सर्वांना धक्का दिला होता. तिने अचानक सोशल मिडियावर या संबंधित फोटो शेअर केले होते. विवाहानंतर उघड झाले होतो की ती लग्नाआधीच प्रेग्नेंट होती. त्यानंतर मुलं झाल्यावर तिने आपल्या मुलांचे फोटो देखील सोशल मिडियावर शेअर केले होते.

 

Loading...
You might also like