‘टॉयलेटमध्ये मुलीला केलं होतं ब्रेस्टफीड’, नेहा धुपियाचा खुलासा ! (व्हिडीओ)

मुबंई : पोलीसनामा ऑनलाईन – सध्या अनेक सेलिब्रिटीज पब्लिक प्लेसमध्ये ब्रेस्टफीडला प्रमोट करताना दिसत आहेत. नुकताच अभिनेत्री नेहा धुपियाने आपल्या सोबत झालेल्या अशाच एका घटनेचा खुलासा केला आहे. यात तिने आपल्या मुलीला टॉयलेटमध्ये बसून ब्रेस्टफीड केल्याचा उल्लेख केला आहे.

एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत नेहा म्हणाली, “मी विमानाचं टॉयलेट, झाडाच्या मागे, कारमध्ये, क्लोजअपसाठी तोडांसमोर कॅमेऱ्यासोबत मुलगी मेहरला ब्रेस्टफीड केलं आहे. मला असं वाटतं की, आपल्याला मुलांना ब्रेस्टफीड करण्यासाठी एक चांगली जागा हवी. मी का माझ्या बाळाला टॉयलेटमध्ये खायला देऊ.”

नेहा म्हणाली, “ब्रेस्टफीड मुलांना हेल्दी ठेवण्याचं सर्वात निरोगी माध्यम आहे. लोकांनी कोणासाठीही जजमेंटल होऊ नये कारण प्रत्येक महिला किंवा आईसाठी परिस्थिती वेगवेगळी असू शकते.”

नेहा धुपियाने ब्रेस्टफीडच्या ‘या’ कॅम्पेनला केली सुरुवात
नेहा धुपियाने नुकतीच #freedomtofeed कॅम्पेनला सुरुवात केली आहे. या कॅम्पेनच्या अंतर्गत ती पहिल्यांदाच आई होणाऱ्या महिलांना, मुलांना खायला प्यायला घालण्याच्या योग्य पद्धतींबद्दल जागरूक करत आहे. तिच्या कॅम्पेनला चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे.

Visit : Policenama.com