स्पर्धकाला शिवीगाळ केल्यानंतर ‘ट्रोल’ झाली अभिनेत्री नेहा धुपिया ! आता दिलं ‘हे’ स्पष्टीकरण

पोलीसनामा ऑनलाइन टीम – रोडीजच्या ऑडिशनदरम्यान स्पर्धकाला अपशब्द वापरल्यानंतर आता अभिनेत्री नेहा धुपिया सोशल मीडियावर टीकेची धनी होताना दिसली. नॅशनल टीव्हीवर शिवीगाळ केल्यानं तिच्यावर टीका झाली. रोडीजच्या ऑडिशनदरम्यान आपलं नियंत्रण हरवल्यानं नेहानं मुलीला कानाखाली लगावल्यासंदर्भात एका मुलाला सुनावलं होतं. यानंतर ती सोशलवर ट्रोल होऊ लागली. यावर आता नेहानं तिची प्रतिक्रिया दिली आहे.

नेहानं ट्विटरवरून एक मोठा लेख लिहिला आहे आणि स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला आहे. नेहा म्हणाली, “मी गेल्या 5 वर्षांपासून रोडीजचा हिस्सा आहे. शोमध्ये मी हिंसाचाराविरोधात आवाज उठवला. परंतु काही काळापासून माझ्यासोबत काही ठिक होताना दिसत नाही. एकानं मला सांगितलं की, त्याला त्याच्या गर्लफ्रेंडनं चीट केलं म्हणून त्यानं तिला कानाखाली मारली. मला हे चुकीचं वाटलं म्हणून मी त्याचा समाचार घेतला.”

नेहा पुढे म्हणाली, “प्रत्येकाची ज्याची त्याची चॉईस आहे. त्याला पूर्ण हक्क आहे की, त्यानं त्याच्या आवडी निवडीनुसार चालावं. परंतु कोणसोबत फिजिकल होणं चांगलं नाही. गेल्या दोन आठवड्यांपासून माझं पेजच नाही तर माझ्या कुटुंबीयांना, मित्रांना आणि टीम मेट्सना अपशब्दात मेसेज येत आहेत. माझ्या वडिलांचं व्हॉट्सॲपही शिव्यांनी भरलं आहे. इतकेच नाही तर माझ्या मुलीच्या पेजवरही लोक शिवीगाळ करत आहेत. मला हे मान्य नाही.”

नेहा म्हणाली, “मी फिजीकल ॲब्युजच्या विरोधात आहे. नेहमीच याच्याविरोधात उभी राहणार. भारत नाही तर जगभरात घरगुती हिंसा होत असते. ही एक मोठी समस्या आहे. माझी लोकांना विनंती आहे की, त्यांनी याबाबत दक्ष व्हायला हवं. जर कोणी याला बळी पडत असेल तर त्यानं बिंधास्त आवाज उठवायला हवा. तुम्ही एकटे नाही आहात हे लक्षात ठेवा.”