पोलीसनामा ऑनलाइन टीम – Neha Dhupia | ‘पठाण’ या चित्रपटाने सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. पहिल्या दिवशी या चित्रपटाने रेकॉर्ड ब्रेक कमाई केली आहे. शाहरुख खानच्या ‘पठाण’ चित्रपटावरून अनेक वाद पाहायला मिळाले. मात्र चित्रपट प्रदर्शित होताच चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर एकच धुमाकूळ घातला. या चित्रपटाने पहिल्या चार दिवसातच तब्बल 200 कोटींचा आकडा पार केला आहे. तर या चित्रपटाच्या मार्फत शाहरुख खान तब्बल 4 वर्षानंतर मोठ्या पडद्यावर झळकला आहे. या चित्रपटाला मिळणारा प्रतिसाद पाहून कलाकारही आनंदीत झाल्याचे दिसत आहे. यादरम्यान सध्या लोकप्रिय अभिनेत्री नेहा धुपिया यांनी केलेले वक्तव्य चर्चेचा विषय बनत आहे. (Neha Dhupia)
जवळपास 20 वर्षांपूर्वी शाहरुख बद्दल नेहाने एक मोठे वक्तव्य केले होते. जे आता सत्यात उतरताना दिसत आहे. नेहाने ट्विट शेअर करत त्याचीच आठवण करून दिली आहे. 20 वर्षांपूर्वी नेहाने दिलेल्या एका मुलाखतीत तिला विचारण्यात आले होते की बॉलीवूड मध्ये काय विकलं जाईल आणि काय कायम राहील? यावर उत्तर देत नेहाने म्हटले होते की, “बॉलीवूड मध्ये केवळ शाहरुख खान आणि सेक्स विकला जाईल. तो पुढे ही कायम राहील हे त्यांचं राज्य आहे”. नेहाचे हे वक्तव्य खरं ठरते हे आता दिसत आहे. (Neha Dhupia)
20 years on, my statement rings true.
This is not an "actor's career" but a "King's reign"! #KingKhan @iamsrk 🙌 https://t.co/TMgPzpJed4— Neha Dhupia (@NehaDhupia) January 28, 2023
नेहा जरी लोकप्रिय अभिनेत्री असली तरी ती शाहरुख खानची खूप मोठी फॅन आहे. 28 जानेवारीला नेहाने ट्विट करत
आपलं म्हणणं योग्य असल्याचं दाखवून दिले आहे. सध्या नेहाचे हे ट्विट सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.
तर शाहरुखचे चाहते देखील यावर भरभरून प्रतिक्रिया देत आहेत. पठाण या चित्रपटाने आतापर्यंत जगभरात 300 कोटींचा आकडा पार केला आहे.
या चित्रपटाने भारतात तब्बल 200 कोटींची कमाई केली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन सिद्धार्थ आनंद यांनी केले
असून या चित्रपटात शाहरुख खान बरोबर दीपिका पादुकोण आणि जॉन अब्राहम हे देखील महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.
तर हा चित्रपट 25 जानेवारीला प्रदर्शित करण्यात आला आहे.
Web Title :- Neha Dhupia | neha dhupia viral statement on shahrukh khan 20 years back says shahrukh and sex will be sell in bollywood
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Lingayat Samaj Protest | मुंबईतील लिंगायत समाजाचा मोर्चा स्थगित, 70 ते 80 टक्के मागण्या पूर्ण