नेहा धुपियानं आपल्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त शेअर केला 5 बॉयफ्रेंडचा 1 फोटो ! पती म्हणाला…

पोलिसनामा ऑनलाइन –बॉलिवूडमधील क्युट कपलपैकी एक नेहा धुपिया आणि अंगद बेदी यांनी 10 मे रोजी आपल्या लग्नाचा दुसरा वाढदिवस साजरा केला. लॉकडाऊन असल्यानं ते मित्रांसोबत आपला वाढदिवस साजरा करू शकले नाहीत. परंतु वाढदिवस खास बनवण्याचा त्यांनी प्रत्येक शक्य तो प्रयत्न केला. पती अंगदला नेहानं आपल्या अंदाजात शुभेच्छा दिल्या आहेत. आपल्या बिंधास्त अंदाजामुळे चर्चेत राहणाऱ्या नेहानं तिचंच एक वादग्रस्त विधान रिपीट केलं.

नेहानं तिचे आणि अंगदचे काही खास फोटो ट्विटरवरून शेअर केले आहेत. ट्विट करताना तिनं लिहलं की, “हॅप्पी अॅनिव्हर्सरी माय लव. या सोबतीची दोन वर्षे. अंगद माझ्या आयुष्यातील प्रेम आहे. एक सपोर्ट सिस्टीम आहे. एक चांगला बाप आहे. माझा बेस्ट फ्रेंड आहे. खूप वैताग देणारा माझा रूम मेटही आहे. हा असं काह आहे की, मला एका माणसातच 5 बॉयफ्रेंड मिळाले आहेत. ही माझी चॉईस आहे.” नेहानं हीच पोस्ट तिच्या इंस्टावरूनही शेअर केली आहे.

पत्नीच्या छानशा गिफ्टनंतर अंगदनंही यावर रिप्लाय केला आहे. तो म्हणाला आहे की, नेहा तुझ्यावर कायम प्रेम राहिल. हॅप्पी अॅनिव्हर्सरी. यावेळी त्यानं सर्वांचेह आभारही मानले आहेत.

काही दिवसांपूर्वी रोडिजची जज असलेल्या नेहानं एका स्पर्धकाला झापलं होतं. त्याची गर्लफ्रेंड पाच मुलांशी बोलते म्हणून त्यानं तिच्या कानशिलात लगावली होती. यावर नेहा त्याला ओरलडली होती. ती कितीही बॉयफ्रेंड ठेवो ती तिची चॉईस आहे. यानंतर ती प्रचंड ट्रोल झाली होती.