अभिनेत्री नेहा धूपियाचा ‘ब्रेस्टफिडिंग’चा व्हिडिओ, ‘स्वातंत्र्य असणे गरजेचे’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूडची अभिनेत्री नेहा धूपियाने १८ नोहेंबरला मुलगी मेहरला जन्म दिला. सध्या नेहा आपल्या मुलीसोबत वेळ घालवित आहे. ती सोशल मिडियावर आपल्या मुलीसोबत फोटो शेअर करत असते. नुकतेच नेहाने ब्रेस्टफिडिंगचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. यासोबतच तिने आपला अनुभव देखील सांगितला आहे. नेहा आता कॅम्पेन चालवित आहे ज्यामध्ये ती महिलांना आपल्या मुलांना ब्रेस्टफिडिंग करण्याची मागणी करत आहे.

नेहाच्या या व्हिडिओमध्ये मुलीचा चेहरा दिसत नाही. व्हिडिओसोबतच नेहाने लिहले की, ‘आई झाल्यानंतर बाळाला फिडिंग करण्याचे स्वातंत्र्य असले पाहिजे.’ या व्हिडिओमध्ये नेहाने सांगितले की, ती बाळासाठी रात्रभर जागते. तिची मुलगी आता ८ महिन्यांची झाली आहे.

नेहाने सांगितले की, तिने सुरुवातीचे ६ महिने मेहरला ब्रेस्टफिडिंग केले. तिने पुढे सांगितले की, ‘एकदा मी मेहरबरोबर फ्लाइटमध्ये प्रवास करत होते. त्यानंतर तिने आपल्या सह-प्रवाशांना सांगितले की, ती १५ मिनिटे वॉशरूममध्ये थांबेल. अशा प्रकारे, तिने मेहेरला वॉशरूममध्ये नेऊन ब्रेस्टफिडिंग केले.’

तिने सांगितले की, ‘मला कळत नाही की, एका आईला यासाठी माफी का मागावी लागते ? आई ब्रेस्ट फिडिंग करण्याच्या वेळी एवढा का विचार करते.’ अशाप्रकारे तिने महिलांना जागृक करण्यासाठी हा व्हिडिओ शेअर केला आहे.

आई बनल्यानंतर नेहा काम करत आहे. तिचा चॅट शो ‘नो फिल्टर नेहा’ खूप प्रसिद्ध आहे. तिच्या चित्रपटाबद्दल बोलायचे म्हणले तर नेहा शेवटी ‘हेलीकॉप्टर इला’ चित्रपटात दिसून आली होती. या चित्रपटात तिच्यासोबत काजोल देखील होती. यासोबतच तिला ‘लस्ट स्टोरीज’ पाहिले गेले होते. याव्यतिरिक्त ती सलग टीव्ही शो ‘रोडीज’ ची शुटिंग करत आहे.

आरोग्यविषयक वृत्त –