‘जागरण’ कार्यक्रमात गाणं म्हणत सुरू केलं सिंगिंगचं करिअर, अशा प्रकारची आहे नेहा कक्कडची कहानी

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –    सिंगर नेहा कक्कर आज (शनिवार दि 6 जून 2020) तिचा वाढदिवस साजरा करत आहे. उत्तरांखडमधील ऋषीकेशमध्ये जन्मलेल्या नेहा कक्करनं दिल्लीत शिक्षण घेतलं आहे. अनेकांना ही गोष्ट माहिती नसेल परंतु नेहानं आपल्या सिंगिंग करिअरची सुरुवात धार्मिक कार्यक्रमात भजन गात केली होती. परंतु इंडियन आयडलनं तिच्या आवाजाला एक वेगळी ओळख दिली. इथं ती विजेता जरी झाली नसली तरी ती चाहत्यांच्या मनात घर करण्यास यशस्वी झाली. आज ती हिंदी आणि पंजाबी गाण्यांसाठी खूप फेमस आहे. आज आपण तिच्या आयुष्यातील 10 रोचक गोष्टी जाणून घेणार आहोत.

1) 2005 मध्ये नेहा इंडियन आयडलमध्ये आली होती. ती विजयी झाली नसलीतर तरी या शोची ती 2 वेळा जज बनली आहे. 2018 आणि 2019 मधील इंडियन आयडलच्या 3 जजमध्ये एक नाव नेहा कक्कर होतं. इतकंच नाही तर सा रे गा मा पा लिटल चॅम्प शोमध्येही तिनं जजिंग केलं आहे.

2) 2008 मध्ये नेहानं तिचा पहिला म्युझिक अल्बम रिलीज केला होता. Neha- The Rockstar असं या अल्बमचं नाव होतं. मीत ब्रदर्सनं याला म्युझिक दिलं होतं.

3) 2009 मध्ये नेहानं सिंगर म्हणून बॉलिवूड डेब्यू केला होता. 2009 मध्ये आलेल्या ब्लू सिनेमाचं थीम साँग तिनं गायलं होतं. या आणखी 5 को सिंगर होते. ज्या सिनेमात तिनं सिंगर म्हणून गायलं तो सिनेमा आहे मीराबाई नॉटआउट. या सिनेमातील हाय रामा तिनं सिंगर म्हणून गायलेलं पहिलं गाणं आहे. या गाण्यात तिच्यासोबत सुखविंगर सिंग होते. हे गाणं खूप गाजलं.

4) नेहानं चाहत्यांसाठी नेहा कक्कर अॅपही लाँच केलं आहे. याला चांगला प्रतिसाद मिळाला आहे.

5) बॉलिवूड स्टार शाहरुख खान तिचा फेवरेट अॅक्टर आहे. तिनं त्याच्यासाठी SRK अँथमही गायलं आहे.

6) नेहाचे सोशलवर 38.6 मिलियन लोक फॉलो करतात. कोणत्याची भारतीय सिंगरचे एवढे फॉलोवर्स नाहीत. नेहा कायमच चाहत्यांच्या संपर्कात असते.

7) नेहाला 2020 म्हणजे याच वर्षी 15 व्या मिर्ची अवॉर्डसाठी सोशल मीडिया आयकॉन ऑफ द ईयरचा अवॉर्ड देण्यात आला आहे.

8) नेहाला प्रो कबड्डी लीगमध्ये नॅशनल अँथम गाण्याचा गौरवदेखील प्राप्त झाला आहे. एखाद्या सिंगरसाठी ही सन्मनाची बाब आहे.

9) नेहाचं पहिलं सुपरहिट बॉलिवूड साँग सेकंड हँड जवानी होतं. 2012 साली सैफ आणि दीपिकाच्या कॉकटेल सिनेमासाठी तिनं हे गाणं गायलं होतं. खूप वेळ गाणं ट्रेंडमध्ये होतं.

10) 11 मे 2020 रोजी नेहा आणि तिचा भाऊ टोनी कक्कर यांचं भीगी भीगी हे गाणं रिलीज झालं आहे.

 

 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like