‘सिंगर’ ‘नेहा-आदित्य’ च्या लग्नाच्या 4 दिवस आधीच वडिल उदित नारायण यांनी दिली ‘शॉकींग’ न्यूज

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – सिंगिंग रिअ‍ॅलिटी शो इंडियन आयडल नेहमीच चर्चेत राहिला आहे. आदित्य नारायण आणि नेहा कक्कर यांच्या रिलेशनशिपच्या जोरदार चर्चा सुरू आहेत. दोघांनी वॅलेंटाईन डेच्या दिवशी लग्न करणार असल्याचं म्हटलं होतं.

यानंतर अनेकांनी आरोप केले होते की, शोला टीआरपी मिळवून देण्यासाठी हे सगळं केलं जात आहे. परंतु आता जे काही घडत आहे ते पाहून हा आरोप खरा आहे की काय अस वाटू लागलं आहे. कारण आदित्यचे वडिल उदित नारायण यांनी हा निर्णय घेण्यासाठी काही दिवस थांबवण्यासाठी सांगितलं आहे.

एका वेबसाईटशी बोलताना उदित म्हणाले, “आदित्य आमचा एकुलता एक मुलगा आहे. आम्ही त्याच्या लग्नाची वाट पहात आहोत. जर लग्नाच्या अफवा खऱ्या झाल्या तर आम्ही जगातील सर्वात भाग्यवान आई – बाप असू. परंतु आदित्यानं याबाबत अद्याप काही शेअर केलेलं नाही. मला वाटतं की, नेहा कक्कर आणि आदित्यच्या लग्नाच्या अफवा टीरआपीसाठी उडवल्या गेल्या आहेत. इथे नेहा जज आणि माझा मुलगा अँकर आहे.”

आदित्य नारायणनं नेहा कक्करसोबत लग्न करण्यासाठी चॅनलवर हो म्हटलं होतं. आदित्यनं म्हटलं होतं की, तो नेहासोबत 14 फेब्रुवारीला शोमध्ये लग्न करणार आहे. चॅनलनं दोघांच्या लग्नाची पत्रिकाही छापली होती.

आदित्यचे वडिल उदित नारायण जेव्हा शोमध्ये आले होते तेव्हा त्यांनी नेहाचं कौतुक केलं होतं आणि कतिला आपली सून बनवण्याची इच्छा व्यक्त केली होती. आदित्यदेखील शोमध्ये अनेकदा नेहासोबत फ्लर्ट करताना दिसला आहे. यानंतर या अफवांना सुरुवात झाली होती.