सिंगर नेहा कक्कर आणि आदित्यच्या लग्नाचा उदित नारायण यांना होणार ‘हा’ फायदा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – सिंगिंग रिअ‍ॅलिटी शोमध्ये सध्या स्पर्धकांच्या गाण्यांपेक्षा दुसरी गोष्ट जास्त चर्चेत येताना दिसत आहे. ती म्हणजे शोची जज नेहा कक्कर आणि होस्ट आदित्य नारायण यांच्यात सुरु असलेलं खुल्लमखुल्ला फ्लर्टींग. नुकतेच या शोमध्ये सिंगर उदित नारायण पत्नीसोबत आले होते. दोघांनीही नेहाला आपली सून म्हणून पसंत केलं आहे. नेहा देखील आदित्यच्या आईला सासू मां म्हणताना दिसली. शोमध्ये तसं तर हे गंमतीनं सुरू होतं. परंतु असं दिसत आहे की, नेहाला सून बनवण्यासाठी उदित नारायण यांनी पूर्ण मन बनवलं आहे. त्यांनी यात त्यांचा फायदाही पाहिला आहे.

नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत उदित नारायण यांना आदित्य आणि नेहाच्या लग्नाबद्दल प्रश्न विचारला गेला. याला उत्तर देताना ते म्हणाले, “नेहा खूपच प्रेमळ आहे. मला ती आवडते. तिनं खूप नाव कमावलं आहे. त्या दोघांची (नेहा आणि आदित्य) जोडीही जमताना दिसत आहे. मला बाकी काही माहिती नाही. परंतु जर हे लग्न झालं तर मला चांगलं वाटेल की माझ्या फॅमिलीत एक फीमेल सिंगर येईल.” हाच मोठा फायदा उदित यांना होणार आहे की, घरात फीमेल सिंगर येईल.

View this post on Instagram

Baap Or Bete Ka Pyaar Hamesha Kayam Rahe 😍😍❤️❤️ Subscribe Our YouTube Channel For Full Videos: https://www.youtube.com/channel/UCRJSOCrN05KhqOf-q_OZDLQ Subscribe Our YouTube Channel For More Videos Link In Profile Bio ♥️♥️ Follow @uditnarayanlive For More Videos And Pictures . . . . . . . . . . #uditnarayanlive #uditnarayan #udit #greatvoice #aamirkhan #alkayagnik #kumarsanu #bollywoodsongs #greatvoice #voiceofindia #indianidol #indianidol10 #indianidoljunior #saregamapa #saregamapalilchamps #kishorekumar #atifaslam #arijitsingh #srk #shahrukhkhan #adityanarayan #aishwaryarai #oldhindisongs #oldisgold #latamangeshkar #rafisahab #kumarsanu #colorstv #indianidol2019 #90ssongs #legend #indianidol11

A post shared by Udit Narayan Live (@uditnarayanlive) on

उदित नारायण लवकरच सिंगिंग रिअ‍ॅलिटी शो सारेगामा लिटल चॅम्पच्या नव्या सीजनमध्ये जज म्हणून काम करताना दिसणार आहे. या शोमध्ये अलका याग्निक आणि कुमार सानू हेही सोबत दिसणार आहेत. हे त्रिकुट त्यांच्या काळातील सुपरडुपर हिट त्रिकुट आहे.

 

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/

 

You might also like