Video : नेहा कक्कर आणि रोहनप्रीत विवाहबद्ध ! व्हायरल झाले फोटो अन् व्हिडीओ

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – फेमस सिंगर नेहा कक्कर आणि रोहनप्रीत सिंग आज (शनिवार दि 24 ऑक्टोबर) लग्नाच्या बेडीत अडकले आहेत. दोघांच्या लग्नाचे काही फोटो आणि व्हिडीओ समोर आले आहेत. नेहा आणि रोहन यांच्या हळदीपासून तर त्यांच्या रिंग सेरेमनीपर्यंत अनेक फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत.

दिल्लीतील गुरुद्वारामध्ये नेहा आणि रोहनप्रीत यांचा लग्न सोहळा पार पडला. लग्नात नेहानं पीच कलचा लहंगा घातला होता तर रोहनप्रतीनं त्याच रंगाची शेरवानी घातली आहे. वधूचा लुक केलेली नेहा खूपच सुंदर दिसत आहे. दोघंही लुकमध्ये खूप सुंदर वाटत आहेत.

नेहाचं लग्न जरी दिल्लीत झालं असलं तरी पंजाबमध्येही ते रिसेप्शन देणार आहेत. त्यांच्या लग्नाला काही जवळचे नातेवाईकच उपस्थित होते. कालच (शुक्रवाी) नेहाचा हळदी समारंभ पार पडला. 20 ऑक्टोबर रोजी नेहाचा रोका सेरेमनी पार पडला होता. 2 दिवसांपूर्वी नेहा कुटुंबासोबत दिल्लीत दाखल झाली होती.

कोण आहे रोहनप्रीत सिंग ?
रोहनप्रीत सिंग इडियाज रायजिंग स्टार 2 या म्युझिक रिॲलिटी शोमध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झाला होता आणि या शोचा तो फर्स्ट रनरअप होता. याशिवाय मुझसे शादी करोगे या वेडिंग रिॲलिटी शोमध्येही तो सहभागी झाला होता. नेहा आणि रोहनप्रीत खूप जुने मित्र आहेत. अलीडेच दोघं एका म्युझिक व्हिडीओत एकत्र दिसले होते.

 

You might also like