Indian Idol 12 : स्पर्धकाचा स्ट्रगल ऐकून भावुक झाली नेहा कक्कर ! केली 1 लाखाची मदत

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – फेमस सिंगर नेहा कक्कर (Neha Kakkar) आणि पंजाबी सिंगर रोहनप्रीत सिंग (Rohanpreet Singh) हे दि. 24 ऑक्टोबर (शनिवारी) रोजी लग्नाच्या बेडीत अडकले आहेत. अलीकडेच नेहा तिचं हनिमून एन्जॉय करून पुन्हा कामावर परतली आहे. नेहा आता एक फेमस सिंगर असून, इंडियन आयडल (Indian Idol)ची ती जज आहे. आजवर तिनं शोमध्ये अनेकांना आर्थिक मदत केली आहे. नेहा खूपच हळवी आहे. याची झलक आता इंडियन आयडल 12 च्या सेटवर पुन्हा पाहायला मिळाली. या शोमध्ये नेहानं एका स्पर्धकाला 1 लाख रुपयांची मदत केली.

विशालनंही दिला मदतीचा हात
इंडियन आयडलचा एक प्रोमो चॅनेलनं सोशलवर शेअर केला आहे. या दिसत आहे की, शहजाद अली नावाच्या एका स्पर्धकाचा स्ट्रगल ऐकून नेहा खूप इमोशनल होते आणि त्याला 1 लाखाची मदत करण्याची घोषणा करते. नेहानं केलेली मदत पाहून विशालनंही त्याला मदत करण्याचं ठरवलं आणि त्याला ट्रेनिंगसाठी एका चांगल्या गुरूला भेटवण्याचं आश्वासन दिलं.

शहजादच्या आजीनं त्याला जयपूर ते मुंबई येण्यासाठी काढलं कर्ज
शहजाद सांगतो की, तो एका कपड्याच्या दुकानात काम करतो. तो लहान असतानाच त्याच्या आईचं निधन झालं होतं. त्यानंतर त्याच्या आजीनंच त्याला वाढवलं. मुंबईला येण्यासाठी त्याच्या आजीनं 5 हजारांचं कर्जही काढलं.

You might also like