Indian Idol : ‘इंडियन आयडल’च्या सेटवर नेहा कक्कर जखमी ? शेअर केला ‘ब्लूपर’ व्हिडीओ !

पोलीसनामा ऑनलाईन टीम  –   इंडियन आयडल (Indian Idol) ची जज फेमस सिंगर नेहा कक्कर (Neha Kakkar) सोशलवर सुपरअ‍ॅक्टीव असते. सोशलवर ती अनेकदा फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. यामुळं ती कायमच चर्चेत असते. पुन्हा एकदा तिचा गमतीशीर व्हिडीओ समोर आला आहे जो व्हायरल होत आहे.

नेहानं तिच्या इंस्टावरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा इंडियन आयडलच्या सेटवरील एक ब्लूपर व्हिडीओ आहे. या व्हिडीओत तिच्या सोबत इतर दोन जज विशाल ददलानी (Vishal Dadlani) आणि हिमेश रेशमिया (Himesh Reshammiya) हेही दिसत आहेत. तिघेही स्लो मोशनमध्ये रॅम्प वॉक करत आहेत.

https://www.instagram.com/reel/CI5KaIPDjlO/?utm_source=ig_embed

यादरम्यान हिमेश उडी मारतो आणि नेहाला त्याच्या हाताच्या कोपराचा धक्का लागतो. नेहाला खूप जोरात लागतं. तिच्या हावाभवावरून ते स्पष्ट दिसतं. परंतु तिनं हासत हासत त्याकडे दुर्लक्ष केलं. तिचे हावभाव पाहून सारेच हसू लागतात. तुम्हीही हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हालाही हसू येईल.

नेहानं व्हिडीओ शेअर करताना लिहिलं की, हा सर्वात विनोदी आणि क्युट व्हिडीओ आहे. या पोस्टमध्ये तिनं विशाल आणि हिमेश यांनाही टॅग केलं आहे.

नेहाचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसत आहे. अनेकांनी यावर कमेंट करत प्रतिक्रिया देखील दिली आहे.