नेहा कक्करचे आरोप ऐकल्यानंतर Ex बॉयफ्रेंड हिमांश कोहलीला बसला मोठा ‘धक्का’, देशही सोडला होता

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – गेल्या वर्षी इंडियन आयडल 11 ची जज नेहा कक्कर आणि तिचा एक्स बॉयफ्रेंड बॉलिवूड स्टार हिमांश कोहली यांच्या ब्रेकअपनं खूप अटेंशन घेतलं होतं. हिमांशसोबच्या ब्रेकअपनंतर नेहानं एका मुलाखतीत सांगितलं होतं की, हिमांश खूपच तक्रार करायचा. मी ब्रेकअपनंतर खुश आहे. चुकीच्या माणसावर मी माझा वेळ खर्च केला. तो माझ्या प्रेमाच्या लायक नाही. नेहाच्या आरोपांच्या दीर्घकाळानंतर आता हिमांशनंही मौन सोडलं आहे.

नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत हिमांश म्हणाला, “माझं नेहावर खूप प्रेम होतं. ब्रेकअपचा निर्णय माझा नव्हता तिचा होता. तरीही शोमध्ये रडून रडून तिनं स्वत:ला निर्दोष सिद्ध केलं आणि मला विलन बनवलं. लोकांना वाटत आहे की, मी तिला धोका दिला आहे. यामुळे मला धक्का बसला होता. यानंतर मी लंडनला गेलो होतो. माझी बहिण माझ्यासोबत होती.” हिमांशनं अद्याप 4 सिनेमे आणि काही म्युझिक व्हिडीओत काम केलं आहे. नेहाला भेटल्यानंतर त्यानं काहीच नाही केलं. त्याला नात्याला जास्त वेळ द्यायचा होता.

2014 साली आलेल्या दिव्या खोसलाच्या यारिया सिनेमातून हिमांशला ओळख मिळाली. यानंतर रांची डायरीज सिनेमाच्या प्रमोशनदरम्यान त्याची आणि नेहाची ओळख झाली. त्यांचं नातं वर्षभर चाललं. नेहाचा आदर करतो म्हणून जास्त काही सांगत नाही. माझं तिच्यावर प्रेम होतं. आणखीही कारणं आहेत ज्यामुळं आम्ही वेगळं झालो असंही हिमांशनं सांगितलं.

हिमांश म्हणाला, “माझ्यावर आरोप केल्यानंतर मी पूर्ण कोसळलो होतो. मला याचा आनंद आहे की, काही महिन्यांनंतर नेहानं स्पष्ट केलं की, मी तिला चीट करत नव्हतो. आता मी सर्वकाही सोडून आलो आहे. आता मला फक्त कामावर लक्ष द्यायचं आहे.”