Neha kakkar | आयफेल टॉवरखाली नेहा कक्कड़- रोहनप्रीतची रोमॅन्टीक KISS, फोटो व्हायरल

पोलीसनामा ऑनलाईन टीम – Neha kakkar | बॉलीवूडमधील सुप्रसिद्ध गायिका नेहा कक्कड़ने (Neha kakkar) आपल्या आवाजानं रसिक प्रेक्षकांच मन जिंकलं आहे. काही दिवसांपूर्वी नेहा तिच्या लग्नामुळे नेटकऱ्यांच्या चांगलीच चर्चेत आली. (Neha Kakkar- Rohanpreet Singh) तिनं आपला प्रियकर रोहनप्रीत सिंग याच्या सोबत काही दिवसांपूर्वी लग्नगाठ बांधली.

 

नेहा कक्कड़ आणि तिचा प्रियकर रोहनप्रीत सिंग नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असतात. त्या दोघांची जोडी सोशल मीडियावर तीव्र प्रमाणात व्हायरल होताना दिसते. त्या (Neha Kakkar- Rohanpreet Singh) दोघांची जोडी नेहमीच सोशल मीडियावर धमाल करतानाचे व्हिडिओ पोस्ट करत असते. अलीकडेच नेहा आणि रोहनप्रीत पॅरिसमध्ये असल्याचं दिसून येतंय. तिनं तिच्या इंन्टाग्रामच्या अकाऊंटवर काही पॅरिस ट्रीपचे फोटो शेअर केले. मात्र नुकताच नेहानं आयफिल टॉवर खाली आपला पती रोहनप्रीत याला किस करतानाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

 

 

 

या फोटोंमध्ये तिनं लाल रंगाचा ड्रेस परिधान केला असल्याचं दिसत आहे. फोटोंमध्ये मागं पॅरिसचा फेमस आयफिल टॉवर दिसत आहे. ते दोघं अगदी रोमॅन्टीकपणे एकमेकांना किस करताना दिसतात. नेहानं (Neha-Rohanpreet Lip Lock Photo) फोटोंमध्ये त्याला मिठी मारलेली दिसत असून ते एकमेकांमध्ये हरवून गेलेले आहेत. या फोटोवर चाहत्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. तर दोघांच्या जोडीबद्दल प्रेम व्यक्त केलं आहे. जवळपास 12 लाख लोकांनी या फोटोला लाईक्स दिले आहे. तर 8 हजारापेक्षा जास्त नेडकऱ्यांनी यावर कमेंट केलं आहे.

 

दरम्यान, नेहाने अनेक चित्रपटांमध्ये गाणी गायले आहे.
तर तिचे अल्बम सॉंग्स देखील बरेच आहेत.
सध्याच्या पिढीत नेहा एक उत्तम गायिका असून, तिचे अनेक तरूण चाहते आहे.
ती नेहमीच चाहत्यांसाठी नवनवीन गाणे घेऊन येते. तसेच चाहते तिच्या गाण्यासाठी नेहमीच आतुर असतात.

 

Web Title :- Neha Kakkar | neha kakkar share lip lock picture with husband rohanpreet singh see their romance in paris

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Ravikant Tupkar | स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते तुपकर यांच्या गाडीचा अपघात; दुचाकीवरील दोघे गंभीर

Solapur Crime | धक्कादायक ! मोबाईलवरील अश्लील व्हिडीओपाहून चेकाळलेल्या पतीनं धरला वेगळाच ‘हट्ट’, पत्नीनं घेतली पोलिसांत धाव

SL Vs WI Test Match | श्रीलंकेचा ‘हा’ खेळाडू बोल्ड होण्यापासून वाचला, पण हिट विकेट झाला (पहा व्हिडिओ )