लग्नासाठी नेहा कक्करनं केलं होतं प्रपोज; परंतु ‘या’ कारणामुळं रोहनप्रीत सिंगनं दिला होता नकार !

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –    फेमस सिंगर नेहा कक्कर (Neha Kakkar) आणि पंजाबी सिंगर रोहनप्रीत सिंग (Rohanpreet Singh) हे शनिवारी (दि. 24 ऑक्टोबर) लग्नाच्या बेडीत अडकले आहेत. अलीकडेच नेहा तिचं हनिमून एन्जॉय करून पुन्हा कामावर परतली आहे. नेहा इंडियन आयडल (Indian Idol) मध्ये जज आहे. त्यांच्या लग्नाला आता एक महिना पूर्ण झाला आहे. मंगळवारी (दि. 1 डिसेंबर 2020) रोहनप्रीतनं त्याचा 26 वा वाढदिवस साजरा केला. अलीकडेच कपिल शर्मा शोमध्ये नेहानं रोहनप्रीत सिंगसोबत तिच्या नात्याबद्दल खुलून भाष्य केलं आणि अनेक न ऐकलेले किस्से सांगितले.

https://www.instagram.com/p/CIP0l2vDQpl/

पहिल्या भेटीबद्दल बोलताना नेहा म्हणाली, दोघं पहिल्यांदा चंदीगढमध्ये भेटले होते. तो ऑगस्ट महिना होता.

https://www.instagram.com/p/CHu7csXjMS1/

रोहनला याबद्दल विचारल्यानंतर रोहननं सांगितलं की, त्याला ऑडिशनसाठी बोलवण्यात आलं होतं. ते गाणं नेहानं लिहिलं होतं आमि म्युझिकही नेहानं दिलं होतं.

https://www.instagram.com/p/CHu7Edyj-t9/

नेहानं हाही खुलासा केला होता की, शूट संपल्यानंतर रोहननं नेहाला तिचा स्नॅपचॅट आयडी मागितला होता. परंतु त्यानं नेहाला व्हॉट्सअ‍ॅपवर मेसेज केला होता.

https://www.instagram.com/p/CHr-muDjPm-/

नेहानं सांगितलं की, तिनं रोहनसोबत लग्नाबद्दल बातचित केली. परंतु सुरुवातीला त्याला काहीसा संकोच वाटला होता. तो सारखं सारखं हेच सांगत होता की, तो आता 25 वर्षांचा आहे. परंतु एक दिवस रोहननं सांगितलंच तो तिच्याशिवाय राहू शकत नाही.

https://www.instagram.com/p/CHlLVwVDggB/

https://www.instagram.com/p/CHPglnUD4tq/