‘सिंगर’ नेहा कक्करनं तिचं सुपरहिट गाणं रिंकु राजगुरूसाठी मराठीत गायलं ! (व्हिडीओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – प्रसिद्ध गायिका नेहा कक्करनं पहिल्यांदाच मराठीत गाणं गायलं आहे. खास बात अशी की, अभिनेत्री रिंकु राजगुरू हिच्या सिनेमासाठी नेहानं हे गाणं गायलं आहे. नेहाचं गाणं मिले हो तुम हमको प्रचंड गाजलं होतं. याचंच मराठी गाणं नेहानं रिंकुच्या मेकअप या आगामी सिनेमासाठी गायलं आहे. नेहानं स्वत: इंस्टाग्रामवरून याबाबत माहिती देत एक व्हिडीओ शेअर केला आहे. रिंकुच्या सिनेमासाठी नेहानं तिला शुभेच्छाही दिल्या आहेत.

सध्या नेहाचा हा व्हिडीओ सोशलवर व्हायरल होताना दिसत आाहे. व्हिडीओत दिसत आहे की, नेहा सांगते, मिलो हो तुम हम को हे गाणं माझ्यासाठी खूप जवळचं आहे. हे गाणं खूप हिट झालं. मला हे गाणं मेकअपसाठी मराठीत गायला मिळालं याचा मला आनंद आहे. मी या सिनेमासाठी खूप उस्तुक आहे. माझ्यासाठी मराठी गाणं खूप अवघड होतं,”

नेहाच्या व्हिडीओत मिले हो तुम हमको या गाण्याची झलक पहायला मिळते. नेहाच्या या व्हिडीओमुळे आता चाहत्यांमधील उत्सुकता अधिकच वाढली आहे. नेहाचं हे पहिलं मराठी गाणं आहे. मेकअप सिनेमा आणि त्यातील हे मराठी गाणं नेहा आणि रिंकुच्या चाहत्यांसाठी पर्वणीच आहे.

मेकअप या सिनेमाबद्दल बोलायचं झालं तर हा सिनेमा गणेश पंडित यांनी लिहिला असून त्यांनीचा हा सिनेमा डायेरक्ट केला आहे. या सिनेमात रिंकु राजगुरूसोबत चिन्मय उद्गीरकर प्रमुख भूमिकेत असणार आहे. याशिवाय दीपक मुकूट, बी बालाजी राव, हिरेन गाडा, नीरज कुमार बर्मन, अमित सिंग यांनी या सिनेमाची निर्मिती केली आहे. 7 फेब्रुवारी रोजी हा सिनेमा रिलीज होणार आहे.